

*सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025*
शासनाने सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय अन्वये २८ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र लोकसवा हक्क अधिनियम २०१५ च्या अंमलबजावणीस १० वर्ष पूर्ण होत असल्याने या दशकपूर्तीचे औचित्य साधुन जिल्हयातील सर्व शासकिय कार्यालयात सर्व पदनिर्देशित अधिकारी व त्यांचे अधिनिस्त अधिकारी/कर्मचारी वर्ग यांनी सेवेची बांधिलकी मानणारी शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा असे निर्देशित करण्यात आलेले आहेतत्याअनुषंगाने दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या उपस्थित त्यांनी सेवा हक्क दिवसाच्या अनुषंगाने शपथे चे वाचन करुन त्यापाठोपाठ उपस्थित असलेले पोलीस अधिकारी/पोलीस अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ यांनी सामुहिक शपथेचे वाचन केले.सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक यांच्यासाह पोलीस निरीक्षक श्री अजय भुसारी, प्रविण मुंडे, कार्यालय अधीक्षक श्री संतोष गेडाम तसेच इतर पोलीस अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्ट : जुबेर शेख
