दिनांक- १६-०५- २०२६ शनिवार   कत्तलीसाठी गोवंश जनावरांना निर्दयतेने कोंबून अवैधरीत्या वाहतूक प्रकरणी ०४ आरोपीतांविरुद्ध कारवाई —- १३ गोवंश जनावरांची सुटका..   गोंदिया(सालेकसा ) :- मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे यांचे निर्देशाप्रमाणे व पोलीस पोलीस  निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर , स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथील पोलीस पथक जिल्हा हद्दीत अवैध धंदावर धाड करणेकामी पेट्रोलिंग करीत असताना माहिती प्राप्त झाली कि पोलीस स्टेशन सालेकसा हद्दीत पानगाव (साख़रीटोला) शेतशिवारात काही इसम चारचाकी वाहनाने गोवंश कोंबून भरून क्रूरतेने बांधून कत्तलीसाठी घेऊन जाणार आहेत. मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहीतीच्या आधारे पोलीस स्टेशन सालेकसा हद्दीत पानगाव येथील नहराचे बाजूला असलेल्या शेतशिवारात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने धाड़ टाकली असता सदर ठिकाणी २ इसम एक पांढऱ्या रंगाचे बोलोरो चारचाकी वाहन मध्ये ०६ नग गोवंशिय जनावरे हे दाटीवाटीने कोंबून भरून क्रूरतेने बांधून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे समजले तसेच आजूबाजूची पाहणी केली असता ०७ नग लहान मोठे पांढऱ्या काळ्या रंगाचे गाई व बैल वाहनामध्ये भरण्यासाठी बांधून ठेवल्याचे दिसून आले . नमूद जनावरे वाहन चालकाने त्याचे मालकाचे सांगण्यावरून कत्तलीकरिता नागपूर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. एकूण १३ गोवंश जनावरे प्रत्येकी दहा हजार असा एकूण १,३०,०००/- रुपये व एक बोलोरो पीक अप वाहन अंदाजे किंमत आठ लाख रुपये असा एकुण ९,३०,०००/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने  आरोपी १) सचिन सुरेश वंजारी वय ३० वर्ष रा. लाखनी २) हितेश गभणे वय ३० वर्ष रा. लाखनी ३) मारुती गभणे रा. सिल्ली ४) मोनू हरिणखेडे वय ३० वर्ष रा. पानगांव यांचे विरुद्ध पो.स्टे. सालेकसा येथे अप क्र. २५६ /२०२६ प्राण्यांचा छळवणूक प्रतिबंधक अधिनियम कलम 11(1)d, सहकलम महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 5(अ ),9(अ ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.              सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे, श्री अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे निर्देशान्वये पोलीस   निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर , स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनात पो.हवा. संजय चौहान , सुबोध बिसेन, दिक्षीतकुमार दमाहे, पो.शि. राकेश इंदूरकर , छगन विठ्ठले , हंसराज भांडारकर स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी केली।

रिपोर्ट : जुबेर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *