
जुगार खेळणाऱ्या आरोपीकडून ५ अँड्रॉइड मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ८१,४५०/- रुपयाचा माल जप्त. ✅ पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री गोरख भामरे, निर्देश सूचनाप्रमाणे जिल्ह्यात अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या विरुद्ध धाड कारवाई करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. दिनांक १९/०३/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया येथील पथक अवैधधंदा रेड तसेच गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असता खात्रीशिर माहिती प्राप्त झाली कि मौजा नागरा शेत शिवार परिसरात काही इसम ५२ तासपत्तीवर पैश्याची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळ खेळवीत आहेत. मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात मौजा नागरा शेत शिवार परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने धाड घातली असता सदर ठिकाणी इसम नामे १) हरीश तांडेकर वय ३३ वर्ष राहणार झोपडी मोहल्ला गोंदिया २) राजेश लिल्हारे वय ६७ राहणार नागरा ३) आकाश वाढावे वय ३२ वर्ष राहणार रामनगर गोंदिया ४) छन्नु बीरिया वय ५३ वर्ष राहणार सावरटोली गोंदिया ५) रिंकल राजपाल वय ३६ वर्ष राहणार सिविल लाईन गोंदिया हे ५ इसम ५२ तासपत्तीवर पैश्याची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळ खेळतांना मिळून आले. सदर ५ हि इसमांना पंचासमक्ष झडती घेण्यात आली असता त्यांचे ताब्यातून रोख रक्कम रु. ४२०५०/- , ५ अँड्रॉइड मोबाइलव जुगार खेळण्याचे साहित्य अशा एकूण ८२,४५०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीना विचारपूस केली असता सदरचा जुगार हे पिरथलाल उर्फ मुन्ना पतेहे राहणार नागरा व अल्ताफ राहीन राहणार रामनगर गोंदिया हे खेळवीत असल्याचे सांगितले. करिता आरोपी १) १) हरीश तांडेकर वय ३३ वर्ष राहणार झोपडी मोहल्ला गोंदिया २) राजेश लिल्हारे वय ६७ राहणार नागरा ३) आकाश वाढावे वय ३२ वर्ष राहणार रामनगर गोंदिया ४) छन्नु बीरिया वय ५३ वर्ष राहणार सावरटोली गोंदिया ५) रिंकल राजपाल वय ३६ वर्ष राहणार सिविल लाईन गोंदिया ६) पिरथलाल उर्फ मुन्ना पतेहे राहणार नागरा व ७) अल्ताफ राहीन राहणार रामनगर गोंदिया यांचे विरोधात पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण येथे पोहवा संजय चव्हाण नेमणूक स्थागुशा गोंदिया यांचे तक्रारी वरून १६३/२०२६ कलम १२(अ ) महाराष्ट्र (मुंबई) जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण पोलीस करीत आहेत.. सदरची दर्जेदार धाड कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे यांचे निर्देश सूचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार संजय चौहान, सुबोध बिसेन, प्रकाश गायधने, दीक्षितकुमार दमाहे , इंद्रजित बिसेन, दुर्गेश तिवारी, भोजराज बहेकार, संतोष केदार, दुर्गेश पाटील, व राम खंदारे यांनी कारवाई केलेली आहे..
रिपोर्ट : जुबैर शेख
