Ancor :- गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भागी येथे शारदीय नवरात्रीचे औचित्य साधून दांडीया व रासगरबा चे आयोजन शाळेतील मैदानात कऱण्यात आले होते. विध्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ या सर्वांचा यात सहभाग होता. शाळेच्या गरबास्तळी गरबाच्या तालावर समस्त गावकरी व विद्यार्थी यांनी ठेका धरला. पालक व ग्रामस्थांनी गरबा व दांडीया खेळण्यासाठी प्रचंड उत्साहात प्रतिसाद दिला.Vo :- जिल्हा परिषद शाळा भागी ही गोंदियाजिल्ह्यातील नावाजलेली जिल्हा परीषद शाळा असून अभ्यासाबरोबरच संस्कृती चा ठेवा असणारी संस्कृती व संस्कार जोपासण्याचा अविरत प्रयत्न करणारी शाळा म्हणून तिचा नावलौकिक आहे. शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी या गरबा व रास दांडियाचे आयोजन शाळेच्या आवारात करण्यात आले होते. गरबा व दांडीया ड्रेस चा पेहराव करुन सर्व शिक्षकवर्ग व पालकगण व विध्यार्थी यात सहभागी झाले होते. या गरबा व रास दांडीया सोहळ्याचा आरंभ शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष आरती जांगळे, उपाध्यक्ष मुकेश खरोले, संपुर्ण शाळा व्यवस्थापन समीतीचे सदस्य यांच्या समवेत मुख्याध्यापक नरेन्द्रं अमृतकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करुन गरबा कार्यक्रमाला सुरू करण्यात आला. या गरबा दांडीया सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी परिधान केलेेले गुजराती गरबा ड्रेस. या संपूर्ण गरबा व दांडीया सोहळ्याचे आयोजन संपुर्ण शाळा व्यवस्थापण समीतीचे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तर शाळेचे मुख्याध्यापक नरेन्द्रं अमृतकर यांच्या नेतृत्वाने करण्यात आले होते . Byte :- आरती जांगळे (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समीती)Byte :- नरेन्द्रं अमृतकर (मुख्याध्यापक)*प्रतिनीधी जुबेर शेख गोंदिया.*

रिपोर्टर : ज़ुबेर शैख़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *