देवरी, दि. 13 ; दसरा उत्सव समीती सूपर 24 तर्फे काल दि. 13 ऑक्टोंबर रविवार रोजी रात्री 8.30 वाजता 51 फुट उंचीच्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. रावण दहन प्रसंगी चिचगड रोडवरील नगरपंचायतचा मैदान गर्दीने भरलेले होते. रावण दहण बघण्यासाठी शहरांसह ग्रामीण भागातून लाखोच्या संख्येत नागरीक मैदानावर दाखल झाल होते. या रावण दहणात दसरा उत्सव समीती सूपर 24 तर्फे, वेगवेगळे आकर्षक, सांस्कृतीक कार्यक्रम, शहरात राम सीता झाकी व फटांक्याची जोरदार आतीष बाजी केली गेली. तर या रावण दहणात हरियाणाचे बंजरगी लाखो दर्शकांसाठी आकर्षक ठरले. देवरी शहरातुन राम सीता व हरियाणाचे बजरंगी यांची झाकी ढोल तासाच्या गजरात काढत जोरदार आतीष बाजी करण्यात आली. या महोत्सवात धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांसह विविध स्पर्धेचा प्रदर्षन करन्यात आले. दसऱ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या या रावण दहन कार्यक्रमास जिल्हाभरातून लाखोंच्या संख्येने नागरीक उपस्थित होते. फटाक्यांच्या आतिषबाजीने उजळले देवरी शहर…काल (दि.13) रावण पुतळा दहनप्रसंगी देवरी नगरपंचायत मैदानावर नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली. विशेष म्हनजे यासाठी प्रदुषण मुक्त फटाक्यांचा वापर करण्यात आला. यात कलर तोफ, आवाजाचे फटाके आदींचा समावेश होता . या आतिषबाजीने देवरी शहर उजळून निघाले होते.मैदानात रामलीलेत प्रभू श्रीराम-रावणाचे युद्ध तर बजरंगीची प्रमुख भुमीका पडली पार …रावण दहना अगोदर नगरपंचायतच्या मैदानावर कलावंतांच्या वतीने रामायणातील विविध प्रसंग सादर करण्यात आले. रावण दहण प्रशंगी प्रभू श्रीराम-रावणातील युद्ध व रावण वधाचा प्रसंग सादर करण्यात आला. तर हरियाणाच्या बंजरगीची विशेष भुमीका यावर्षी हजारो – लाखो नागरीकांना बघायला मिळाली.
रिपोर्टर : जुबेर शेख