*गुरुवार दिनांक- 22/05/ 2025* *पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया, श्रीमती रोहिणी बानकर, यांचे मार्गदर्शनात रामनगर पोलीसांची कारवाई;-* *जाब देणार नामे- नरेश नारायण तरोणे वय 38* वर्षे राहणार फुलचुरनाका आर.टी. ओ. ऑफीस जवळ, गोंदिया असे हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे..⏩…. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, *पोलीस ठाणे रामनगर* परिसरातील *जाब देणार सराईत गुन्हेगार ईसम नामे- नरेश नारायण तरोणे वय 38 वर्षे राहणार फुलचुर नाका आर.टी. ओ. ऑफीस जवळ गोंदिया* याचेविरुद्ध *पोलीस ठाणे गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, रामनगर, गोरेगाव* येथे खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, शिवीगाळ, शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करणे, धमकी देणे, इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, अशा विविध सदराखाली गंभीर 9 गुन्हे दाखल आहेत.. *पोलीस ठाणे रामनगर पोलीसांनी* नमूद सराईत गुन्हेगार जाब देणार विरुद्ध वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्याचे चारित्र्यात आणि सवयीत कसलीही सुधारणा झालेली नाही.. या उलट.सदर गुन्हेगार हा सवयीचा मंगरूर व धाडसी प्रवृत्तीचा असल्याने परिसरातील लोकांच्या मनात दहशत निर्माण होवून त्याच्या कृतीमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने त्याचेविरूद्ध पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे रामनगर यांनी गोंदिया, जिल्हा हद्दीतून हद्दपार करणे करीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1),(अ),(ब) अन्वये हद्दपार प्रस्ताव क्रं. 11/2022 प्रमाणे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांचेकडे मंजुरीस्तव सादर केलेला होता… उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांचे आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया यांनी विहीत मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून *नमूद गुन्हेगारास गोंदिया, जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती..* या अनुषंगाने *उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया – श्री. चंद्रभान खंडाईत, यांनी* सराईत गुन्हेगार जाब देणार यास तीन महिन्याच्या कालावधी करीता गोंदिया, जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात येत असल्याबाबतचे आदेश दिनांक- 21/05/2025 रोजी पारित केले असून नमूद सराईत गुन्हेगारास गोंदिया जिल्ह्यातून *3 महिन्याच्या कालावधी* करीता हद्दपार करण्यात आले आहे… गोंदिया जिल्हा पोलीस व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया- श्री. चंद्रभान खंडाईत यांनी केलेल्या हद्दपार कारवाईमुळे अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी केलेल्या हद्दपार कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे.. सदरची कारवाई मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया, श्रीमती रोहिणी बानकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक- श्री. प्रवीण बोरकुटे, पोलीस ठाणे रामनगर यांचे मार्गदर्शनात रामनगर पोलीसानी कारवाई केली आहे…… यापुढेही पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे निर्देश सूचनाप्रमाणे अवैध कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे… अवैध कृत्य करणा-या गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्यापासून तसेच अवैध धंदयापासून परावृत्त होवून ईतर वैध रोजगाराकडे वळण्याचे आवाहन गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे….
रिपोर्ट : जुबेर शेख
