

*बुधवार दिनांक 21 मे 2025* 🕹️. सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायान्वये दिनांक- २१/०५/२०२५ रोजी *दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने* दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा…असे निर्देश आहेत …..या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे, मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया, यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथचे वाचन करुन त्यापाठोपाठ उपस्थित असलेले पोलीस अधिकारी/अंमलदार/मंत्रालयीन स्टाफ यांनी सामुहिक वाचन केले. सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, यांच्यासह पोलीस उप-अधीक्षक (मुख्या) श्रीमती- नंदिनी चानपुरकर, पोनि भुसारी तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार/मंत्रालयीन स्टाफ हे मोठया संख्येने उपस्थित होते.
रिपोर्ट : जुबेर शेख
