


*मंगळवार दिनांक :- 20-05-2025* 🪷🪷🪷❇️🕹️❇️🪷🪷🪷 *गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या प्रभावी नक्षलविरोधी मोहिमेमुळे सन 2024-2025 मध्ये एकूण 3 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे*…यामध्ये सन 2024 मध्ये *संजय पुनेम* व *देवा मुडाम* या दोन माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. *या साखळीत ताज्या घडामोडीत, दिनांक 19 मे 2025 रोजी आणखी एका जहाल माओवादीने आत्मसमर्पण करून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला आहे.* …..*मा. जिल्हाधिकारी गोंदिया, श्री. प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, यांचेसमक्ष 3.50 लाखाचे जाहीर बक्षीस असलेला जहाल माओवादी देवसू उर्फ देसु (मूळ नाव – देवा राजा सोडी), वय 24 वर्षे, राहणार- चीटिंगपारा/ गुंडम, पोस्ट – पामेड, पो. स्टे. तर्रेम, तालुका- उसूर, जिल्हा- बिजापूर (छ. ग.) पद – सदस्य, प्लाटून मेंबर (CC मेंबर दिपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे (मृत) याचा बॉडी गार्ड ) असे नुकतेच आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचे नाव आहे…* 🔹 याबाबत थोडक्यात वृत्त असे की, देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत *”नक्षल आत्मसमर्पण योजना”* राबविली जात आहे… 🔹 गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक, मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कैम्प देवरी, श्री. नित्यानंद झा यांचे मार्गदर्शनाखाली माओवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता गोदिया जिल्हयात प्रभावी नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येत असून विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची जनतेला माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे… तसेच जे माओवादी विविध भूलथापा आणि प्रलोभनांना बळी पडून माओवादी संघटनेत भरती झाले आहेत त्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.. 🔹 गोंदिया जिल्हा पोलीसांनी आत्मसमर्पण करीता केलेले आवाहन, माओवादी संघटनेतील वरिष्ठ नेत्यांच्या पिळवणूक आणि अत्याचारास कंटाळून, तसेच माओवादी संघटनेतील अतिशय कठीण वेदनामयी जीवनाला कंटाळून- *3.5 लाखाचे बक्षिस असलेला जहाल माओवादी नामे- देवसू उर्फ देसु (मूळ नाव – देवा राजा सोडी), वय 24 वर्षे, राहणार- चीटिंगपारा/ गुंडम, पोस्ट – पामेड, पो. स्टे. तर्रेम, तालुका- उसूर, जिल्हा- बिजापूर (छ. ग.) पद – सदस्य, प्लाटून मेंबर (CC मेंबर दिपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे (मृत) याचा बॉडी गार्ड )* यानी आज दिनांक 19/05/2025 रोजी मा. जिल्हाधिकारी गोंदिया श्री. प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे समक्ष आत्मसमर्पण केले आहे… ❇️ **आत्मसमर्पित माओवादी – देवसू उर्फ देसु उर्फ देवा* हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील गावातील रहिवासी असून त्याचे गावात नक्षल्यांचे नेहमी येणे जाणे होते. नक्षलवादी जल, जंगल, आणि जमिनीच्या लढाई खाली भोळ्या – भाबड्या आदिवासी नागरिकांना सरकार विरुद्ध भडकावून, तथाकथित व खोट्या क्रांती चे कथन करून लोकांना नक्षल चळवळीत ओढण्याचा प्रयत्न करायचे…त्यामुळे लहानपणापासून तो नक्षलयांच्या विविध प्रलोभन व भूलथापांना बळी पडून नक्षल विचारसरणीशी प्रभावित होऊन बाल संघटन मध्ये रुजू झाला….त्यानंतर ऑक्टोंबर 2017 मध्ये *पामेड पी.एल. 9* मध्ये भरती झाला आणि शासनाविरुद्ध शस्त्र हाती घेतले. माहे- डिसेंबर 2017 मध्ये त्याला इतर काही नवीन भरती झालेल्या माओवाद्यांसह एम. एम. सी. झोन मध्ये पाठविण्यात आले…. एप्रिल 2018 मध्ये तो आपल्या साथीदारांसह एम. सी. सी. झोन (विस्तार एरिया) मध्ये आला…. तिथे दरेकसा, तांडा, मलाजखंड, पी.एल 3 या नक्षल दलम सोबत 8-15 दिवस काम केल्यानंतर त्यास तत्कालीन एम. एम. सी. झोन प्रभारी मिलिंद उर्फ दीपक तेलतुंबडे (सेंट्रल कमिटी मेंबर / सद्या मृत) याचे अंगरक्षक म्हणून नेमण्यात आले होते.. दिनांक – 13 नोव्हेंबर 2021 रोजी मर्दिनटोला, जिल्हा- गडचिरोली येथे नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे याचेसह एकूण 28 नक्षलवादी मारले गेलेत.. सदर चकमकीतून माओवादी देवसु व त्याचे काही साथीदार जीव वाचवून पळून गेले. तेथून माड एरिया मध्ये काम केले. त्यानंतर परत पामेड पी एल 9 मध्ये मध्ये काम केले आहे… सदर माओवादी देवसू उर्फ देसू उर्फ देवा याने सन 2017-2022 मध्ये माओवादी संघटनेत कार्यरत असताना गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात घडलेल्या विविध गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबूल केले आहे… *1) पोलीस ठाणे- चिचगड* (जिल्हा गोंदिया) अंतर्गत कोसबी जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी. (माहे – सप्टेंबर 2018) 2) पोलीस ठाणे- चिचगड (जिल्हा गोंदिया) अंतर्गत तुमडिकसा जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी. (माहे – सप्टेंबर 2018) 3) पोलीस ठाणे- गातापार (जिल्हा राजनांदगाव, सध्या खैरागड / छत्तीसगड) अंतर्गत तांडा जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी. (माहे – फेब्रुवारी 2019) 4) बकोदा (कान्हा भोरमदेव एरिया) जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी. (माहे – मार्च 2019) 5) मर्दीनटोला (जिल्हा गडचिरोली) जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी. (नोव्हेंबर – 2021) *देवसु याचे आत्मसमर्पीत होण्याची महत्वाची कारणे :-** ➖➖➖➖➖➖➖👇1) दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी मर्दिनटोला येथे झालेल्या चकमकीत सीसी मेंबर दीपक तेलतुंबडे याला माझ्यासमोर गोळी लागली व तो मरण पावला. तसेच इतर लहान मोठे कॅडर देखील मारले गेले. माझे सह इतर काही जण तिथून जीव वाचवून पळून गेले… तेव्हापासून मला मृत्यूची व अटकेची सारखी भीती वाटत होती असे देवसु म्हणाला..2) नक्षल संघटनेचे/चळवळीचे नेमके ध्येयधोरण कनिष्ठ कॅडर ला कळत नाही… भविष्य अंधकारमय वाटतो.3) माओवादी संघटनेतील वरिष्ठ कॅडर हे नक्षल चळवळी करीता पैसे/फंड गोळा करण्याबाबत सांगतात. परंतु प्रत्यक्षात सदर पैसा हे स्वतःसाठीच वापरतात.4) शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेचा माओवाद्यांना पाहिजे तसा पाठींबा मिळत नाही…5) माओवादी नेते हे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक- युवतींचा वापर करुन घेतात.6) दलम मध्ये असतांना विवाह झाले तरी वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.7) परीवारातील सदस्यांना, नातेवाईकांना कोणतिही अडचण असली तरीही मदत करता येत नाही.8) दलममध्ये असतांना वेळेवर जेवण वगैरे मिळत नाही. तेथील जिवन फार खडतर असते. जंगलात राहिल्यास आजारपण येत असते. आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जात नाही.9) पोलिसांचे बातमीदार खूप वाढले आहेत… अलीकडील काळात खूप माओवादी पोलिस कारवाईत मारले गेले आहेत. 10) पोलीस दलाच्या सततच्या नक्षल विरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे… पोलिसांची सारखी भीती वाटते.11) वरिष्ठ कॅडर हे पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन निरपराध आदिवासी बांधव/ सामान्य नागरीकांना ठार मारायला सांगतात. हे कदापी संयुक्तिक वाटत नाही. 12) महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावित होऊन समर्पण करण्याचा निर्णय घेतला. 🕹️ सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, आणि अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. नित्यानंद झा, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक- प्रमोद भातनाते, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे, अंमलदार स.फौ. अश्विनीकुमार उपाध्याय, पोहवा. अनिल कोरे, पो.शी. अतुल कोल्हटकर, चंदन पटले, मपोशी. लीना मेश्राम, चालक पो.ना. उमेश गायधने नक्षल सेल गोंदिया यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. 🙏गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे , तसेच अपर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, यांनी माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ठ होवून शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेवुन आपले जीवन सुकर करण्याचे आवाहन केले आहे..
रिपोर्ट : जुबेर शेख
