*दिनांक- 31/12/2024*आज दिनांक- 31-12-2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये माहे डिसेंबर-2024 मध्ये गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी- मंत्रालयीन स्टाफ *1) श्रेणी पोलीस उप-निरीक्षक, श्री. अनिरुध्द प्रल्हाद रामटेके,* *2) श्रेणी पोलीस उप-निरीक्षक श्री. राजेश तुलाराम शहारे,* *3) प्रमुख लिपीक- श्रीमती मिरा संभाजी कुळसंगे,* यांचे निरोप सत्कार समारंभावेळी पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांचे शुभहस्ते सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी, मंत्रालयीन यांना शॉल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, झाडाची रोपटे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, देवुन त्यांचे सत्कार करण्यात आले… तसेच त्यांना पुढील भावी आयुष्याच्या प्रवासात शूभेच्छा देण्यात आल्यात.सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (गृह), श्रीमती- नंदिनी चानपुरकर, पोलीस निरीक्षक, श्री. रामेश्वर पिपरेवार, तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार मंत्रालयीन स्टॉफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोलीस निरीक्षक, श्री. रामेश्वर पिपरेवार, मानव संसाधन शाखा, गोंदिया, यांनी केले… तर सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता कल्याण शाखा येथील, श्री. रामेश्वर पिपरेवार, पोहवा राजु डोंगरे, राज वैद्य, यांनी कार्यवाही पार पाडली.
रिपोर्ट : जुबेर शेख