
शुक्रवार दिनांक- ०७/०८/ २०२६ आरोपीतांकडून चोरीची ७ नग बॅटरी एकूण किमती ३७०००/- रुपये चा मुद्देमाल हस्तगत –००– गोंदिया:- दिनांक ०५/०८/२०२६ रोजी फिर्यादी नामे कॉमेन्द्र खेमराज मेंढे राहणार डोंगरगाव जिल्हा गोंदिया यांनी पोलीस स्टेशन सालेकसा येथे तक्रार दिली की दिनांक ०२/०८/२०२६ ते ०३/०८/२०२६ रोजी रात्री दरम्यान सलोनी पेट्रोल पम्प सावली येथे ठेवलेले ०३ ट्रक व ०१ ट्रॅक्टर मधील असे एकूण ७ बॅटरी कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने पोलीस स्टेशन सालेकसा येथे अपराध क्रमांक ३७६/२६ कलम 303 (2 ) भारतीय न्याय संहिता प्रमाणे दाखल करण्यात आले होते . सदर गुन्ह्यांचा गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे सर यांचे निर्देशाप्रमाणे व पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे ,स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनात दिनांक ०७/०७/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथील पोलीस पथक पोलीस स्टेशन सालेकसा येथे अपराध क्रमांक ३७६/२६ कलम 303 (2 ) भारतीय न्याय संहिता मधील अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांनी गुप्त बातमीदारांकडुन माहीती प्राप्त झाली की, ग्राम छोटा गोंदिया येथील राहणारे 1) आतिष शंकर रहांगडाले वय ३१ वर्ष रा. छोटा गोंदिया याने 2) ऋत्विक बस्तीराम कंटकार वय २५ वर्ष रा.छोटा गोंदिया याचे सह मिळून आमगाव ते देवरी रोडवरील ग्राम सावली येथून काळे पेट्रोल पम्प चे जवळून ट्रक व ट्रॅक्टर चे एकूण ७ बॅटरी चोरी केली आहे. अशी माहिती मिळाल्याने आतिष शंकर रहांगडाले वय ३१ वर्ष रा. छोटा गोंदिया , ऋत्विक बस्तीराम कंटकार वय २५ वर्ष रा.छोटा गोंदिया यांना छोटा गोंदिया परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने चारचाकी वाहन भाडयाने घेऊन त्याने स्वतः चालवून ऋत्विक बस्तीराम कंटकार वय २५ वर्ष रा.छोटा गोंदिया याचे सह मिळून ग्राम सावली येथून काळे पेट्रोल पम्प चे जवळून ट्रक व ट्रॅक्टर चे एकूण ७ बॅटरी चोरी करून कैलास संजय चौधरी वय ३५ वर्ष राहणार प्रिन्स चौक फुलचूर याचे कबाडी दुकानात विकले आहे. त्यानुसार कैलास संजय चौधरी वय ३५ वर्ष राहणार प्रिन्स चौक फुलचूर याचे कबाडी दुकानातून गुन्ह्यातील चोरी गेलेल्या बॅटरी जप्त करण्यात आलेले आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत. १) अंदाजे किमती २२,०००/- रू- चे ४ नग अमरॉन कंपनीची बॅटरी २) अंदाजे किमती ६,०००/- रू- चे १ नग पावरजोन कंपनीची बॅटरी३) अंदाजे किमती ४,०००/- रू- चे १ नग स्टीकर नसलेली बॅटरी४) अंदाजे किमती ५,०००/- रू- चे १ नग एस . एफ. कंपनीची बॅटरी अशा प्रकारे एकूण ७ नग बॅटरी एकुण किंमती ३७,000/- रूपये चा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी नामे 1) आतिष शंकर रहांगडाले वय ३१ वर्ष रा. छोटा गोंदिया याने 2) ऋत्विक बस्तीराम कंटकार वय २५ वर्ष रा.छोटा गोंदिया तसेच गुन्हयातील चोरी चा माल घेणारा कैलास संजय चौधरी वय ३५ वर्ष राहणार प्रिन्स चौक फुलचूर यांना ताब्यात घेवुन पुढील कायदेशिर कार्यवाही करिता मुद्देमाल सह पोलीस स्टेशन सालेकसा येथे स्वाधीन करण्यात आले आहे. सदरची कामगीरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. अभय डोंगरे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलीस निरीक्षक श्री रेवचंद सिंगनजुडे यांचे मार्गदर्शनात पो.हवा. सुबोधकुमार बिसेन ,पो.हवा. विठ्ठल ठाकरे , पो.हवा.दिक्षीतकुमार दमाहे,पो.हवा. संजय चौहान , पो.शी. हंसराज भांडारकर, पो.शि.छगन विठ्ठले,पो.शि. चापोशि. राम खंदारे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी केली आहे.
रिपोर्टर : जुबैर शेख
