November 22, 2024देवरी: गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा निवडणुकीत एकूण ६४ उमेदवार विधानसभा निवडणूक रिंगणात भाग्य आजमावले. २० नोव्हेंबर रोजी या उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. उमेदवाराला डिपॉझिट (अनामत रक्कम) वाचविण्यासाठी प्रत्यक्ष झालेल्या एकूण वैध मतदानाच्या एकषष्ठांश मते मिळविणे गरजेचे असते. त्यामुळे इतके मते मिळविताना अनेकांना घाम फुटतो. या निवडणुकीत मतदार किती उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करतात. हे २३ नोव्हेंबरला कळणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान अनेक उमेदवारांकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करू, अशी गर्जना केली होती. डिपॉझिट जप्त म्हणजे, नामुष्कीजनक पराभव मानला जातो. एकूण वैध मतांच्या एकषष्ठांश मते मिळवू शकत नाहीत, त्यांचे डिपॉझिट जप्त होते.चार मतदार संघात गोंदिया -१५ तिरोडा-२१ अर्जुनी मोरगाव-१९ आमगाव-०९ उमेदवार आहेत. अनेकांना राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. आपल्यामुळे पुढील उमेदवारांच्या अडचणी वाढणार, असे भाष्यही अनेकवेळा उमेदवार करीत असतात. प्रतिस्पर्ध्याला धूळ चारण्यासाठी डावपेच आखले जातात. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत अनेकांची अनामत रक्कम जप्त झालेली आहे. परंतु, तरीही अनेक जणांना निवडणूक लढविण्याचा मोह आवरत नसल्याचे दिसून येत आहे. आपण निवडून येऊ, या आशेवर ते निवडणुकीच्या मैदानात उतरतात तर काही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून नाहक बोंबा मारून निवडणुकीत अतिआत्मविश्वास दाखवतात.

रिपोर्ट : जुबेर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *