

महायुति सरकारचा निषेध देवरी : निवडणुकी पूर्वी प्रत्येक पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून देण्याचे आश्वासन सर्वसामान्य जनतेला दिलेला होता,सत्ता येताच कर्जमाफीला घेऊन राज्यशासनाने हातवर केले आहे,निवडणुकीला सहा महीने लोटून सुद्धा त्यावर काहीच तोड़गा न निघाल्याने सरकार चा निषेध करण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने मशाल आंदोलन करण्यात आले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधुन 11 एप्रिल रोजी रात्रि पुराडा येथे आमदार संजय पुराम यांच्या घरासमोर सदर आंदोलन करण्यात आले.या माध्यमातून शेतकरी, सर्वसामान्य व दिव्यांगानची दिशाभूल करणाऱ्या महायुति सरकारचा निषेध करण्यात आला, तसेच विविध मागण्यांचे निवेदन आमदार संजय पुराम यांच्या मार्फ़त राज्यशासनाला देण्यात आले. कर्जमाफीच्या मुदयावरुन राज्यकर्त्यांनी हातवर करीत स्पष्ट नकार दिला आहे,यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांची दिशाभूल झाली असून सरकारने विश्वासघात केला अशी भावना शेतकऱ्यांमधे आणि जनसामांयमधे निर्माण झाली आहे.या ज्वलंत विषययाला घेऊन प्रहार जनशक्ति संघटनेच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला आहे.सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरात लवकर द्यावी,पेरणी ते कापनी पर्यंत खर्च मग्रारोहयोच्या माध्यमातून करण्यात यावा, दिव्यांगान्ना सहा हजार रुपए मासिक मानधन देण्यात यावा,अशी अनेक मागण्यांचे निवेदन आमदार संजय पुराम यांच्या मार्फ़त राज्यशासनाला देण्यात आला. या वेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष ईश्वर कोल्हारे, सुनील गिरडकर, दिगंबर कोरे,चंदू गायधने,ओमकार झोड़े,पुरुषोत्तम बाहेकर,विष्णु मड़ावी, सुनील राउत,जवाहर वरकड़े, रघुनाथ चूटे, संजय बोहरे,विनोद हलामी,धनराज सोनवाने,राजेश कोरेटी,अमर पुराम, शालिक कोरेटी तसेच अनेक शेतकरी बांधव बहुसंखेने उपस्थित होते.
रिपोर्ट : जुबेर शैख