

*बुधवार दिनांक 12 मार्च 2025* *अवैधरीत्या गोवंश जनावरे वाहतूक प्रकरणी कारवाई करत 20 गोवंशिय जनावरांची केली सुटका….. तर दुसऱ्या कारवाईत एकास तलवारीसह केले जेरबंद* 🕹️… आगामी काळात साजरे होणारे सन उत्सव होळी, धुळवड, रंगपंचमी, रमजान ईद, शिवजयंती इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राहावी, गुन्हेगारावर वचक बसावा याकरिता संपुर्ण जिल्ह्यात *”ऑपरेशन क्रैक डाउन मोहीम”* राबवून जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर तसेच अवैध शस्त्रे बाळगणारे, दारू, जुगार, मटका, गांजाचा व्यवसाय करणारे, जनावरे वाहतूक, करणाऱ्यांवर, प्रभावी दर्जेदार धाडी घालून कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यांनंद झा, यांनी सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, गोंदिया जिल्हा यांना दिले आहेत.. या अनुषंगाने रावणवाडी पोलीसांनी दिनांक 10/03/2025 रोजीचे रात्रो दरम्यान क्रॅक डाऊन मोहीमे अंतर्गत मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे कारवाई करत सावरी येथे ट्रक क्रंमाक एम.एच. 40 ए. के. 3052 हा अवैध गोवंशिय जनावरे वाहतुक करीत असताना मिळून आल्याने अवैध गोवंशिय जनावर वाहतुक करणारा वाहण जप्त करुन एकुण 20 गोवंशिय जनावरांना जिवनदान देवुन अवैधरित्या गोवंश वाहतूक करणारे *आरोपी इसम नामे-* *1) तुलसीदास तुलाराम भलावी वय 35 रा. बिसापुर चंदरपुर त. कुरई* जि. सिवनी मध्यप्रदेश *2) जयराम उदयलाल हिरवाणी वय 52 वर्ष रा. चंगेरा ता.जि.गोंदिया* यांचे विरोधात पोलीस ठाणे रावणवाडी येथे कलम 11(1) (ड) सह कलम 5 (अ) चे उल्लंघण 9, 9 (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनीयम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे… *तर दुसरी कारवाई* दिनांक 11/03/2025 रोजी दुपारी 12/15 वाजता ग्राम कोचेवाही येथे करण्यात आली असता *इसम नामे- संस्कार नंदकिशोर वगारे वय 20 वर्ष रा. कोचेवाही* ता. जि. गोंदिया याचेकडे धारदार घातक शस्त्र एक लोखंडी तलवार किंमती 1000/-रु. ची त्याचे राहते घरात मिळून आल्याने जप्त करण्यात आले. व सदर इसमाच्या विरुद्ध कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे रावणवाडी प्रभारी पो.नि.वैभव पवार, सपोनि. सुनिल अंबुरे, शशिकिरण नावकर, पो. हवा. संजय चौव्हाण, पो.शि. दगडे यांनी कामगीरी बजावली आहे.
रिपोर्ट : जुबैर शेख
