

*शनिवार दि:-18 जानेवारी 2025*🔹🔸⏩❇️🔴❇️⏪🔸🔹 *8 किलो 325 ग्रॅम गांजा, ईतर साहित्य असा किंमती 1 लक्ष 67 हजार 500/- रुपयाचा मुद्देमाल जप्त,* ✅ *दिनांक- 17/01/2025 रोजी* स्था. गु. शां. पथकास गोपनिय बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, दोन इसम हे ओडिसा येथून रायपुर मार्गे रेल्वेने गांजाची खेप घेवून गोंदिया रामनगर परीसरात येणार आहेत.. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने पो. नि.श्री. लबडे आणि मा. वरिष्ठांना सदर माहिती कळवून मा. वरिष्ठांचे प्राप्त आदेश, दिशा निर्देश व परवानगीवरून मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलीस ठाणे रामनगर हद्दीत धाड कारवाईस लागणारे आवश्यक सर्व साहित्य, शासकीय पंच, मापारी, फोटोग्राफर, पो. स्टाफ, सोबत घेऊन रवाना होवून रेलटोली मालधक्का हनुमान मंदीर समोरील गोंदिया ते बालाघाट जाणाऱ्या रोडवर सापळा रचून कारवाई करण्यात आली असता अवैधरित्या गांजा ची खेप घेवून येणाऱ्यास एका विधीसंघर्ष बालकांसह दुपारी 14.40 वाजता दरम्यान रंगेहाथ पकडण्यात आले. त्या दोघांना ही पोलीसांची ओळख देवून त्यांना ताब्यात घेण्याचे कायदेशीर कारण सांगून प्राप्त माहिती प्रमाणे त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या दोन्हीं बॅगची पंचासमक्ष पाहणी केली असता…त्याचे ताब्यातील निळ्या व ग्रे रंगाच्या स्कुल बॅगमध्ये सेलोटेपने गुंडाळलेले (टेपने वेस्टन असलेले) 8 नग बंडल मिळुन आलेत…….वेस्टन असलेल्या बंडल ची पंचासमक्ष खोलून पाहणी केली असता, त्यात हिरवा ओलसर पाने, फळे, फुले आणि बिया मिश्रीत एकूण वजनी 8 किलो 325 ग्रॅम, उग्र वास येत असलेला गांजा, दोन बॅग असा *किंमती एकूण 1,67,500/- (एक लक्ष सदुशस्ठ हजार पाचशे रूपयाचा मुद्देमाल)* मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे. मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनात सदरची धाड कारवाई ची सविस्तर जप्ती प्रक्रिया कारवाई करण्यात आलेली आहे…. ▶️ *अवैधरित्या विक्रीकरीता गांजा ची खेप घेवून येणारा आरोपीत ईसम नामे- 1) देवेंद्रा धनेश्वर बेहरा वय 48 वर्षे, रा.कादलिमुंडा तालुका -किशोर नगर, जिल्हा- अंगुल, राज्य- उडीसा* *2) एक विधिसंघर्ष बालक वय 17 वर्षे राह. माहुलमुंडा साही, कादलिमुंडा पो. ठाणे, तालुका – किशोर नगर, जिल्हा- अंगुल, राज्य- उडीसा* ➖ यांचेविरूध्द सपोनि- धीरज राजूरकर, स्था. गु. शा. यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे रामनगर येथे *एन. डी. पी. एस. कायदा कलम 8 (क), 20, 29 अंन्वये* गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.. आरोपीस, विधिसंघर्ष बालक व जप्त मुद्देमाल रामनगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे….पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया गुन्ह्यांचा तपास रामनगर पोलीस करीत आहेत.. ▪️ सदरची धाड कारवाई मा. वरिष्ठांचे निर्देश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, पो.नि.श्री. प्रविण बोरकुटे पो.ठाणे रामनगर यांचे मार्गदर्शनात सपोनी धीरज राजूरकर, पोउपनि- शरद सैदाने, पोलीस अंमलदार-पोहवा. राजू मिश्रा, महेश मेहर, नेवालाल भेलावे, भूवनलाल देशमुख, सुजित हलमारे, संतोष केदार, दुर्गेश पाटील, चापोशि- घनश्याम कुंभलवार, यांनी तसेच पोलीस ठाणे रामनगर पोलीस स्टॉप पो.उप.नि. अमोल वाघमोडे,पोलीस अंमलदार स.फौ. राजेश भुरे, पोहवा. सुनीलसिंह चौव्हाण, सरोज घरडे, पो. शि.कपील नागपुरे, चापोशि. श्याम फुंडे यांनी कारवाई केलेली आहे..
रिपोर्ट : जुबेर शेख
