*दिनांक- 03 जानेवारी 2024* ⏩ याबाबत थोडक्यांत माहिती अशी की, दरवर्षी 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन साजरा केला जातो….2 जानेवारी 1961 रोजी दिवंगत माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीसांना राज्य पोलीस ध्वज सादर केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.¹या प्रसंगी, दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान समारंभपूर्वक परेड, पोलीस बँड परफॉर्मन्स या सारख्या विशेष युनिट्सद्वारे प्रात्यक्षिकांसह पोलीस स्टेशन स्तरावर विविध कार्यक्रम-उपक्रमांचे आयोजन केले जाते… महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन हा राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाचे समर्पण आणि सेवा ओळखण्याची एक संधी आहे. अहोरात्र 24 तास कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलीसांचे कामकाज कसे चालते याविषयी शाळकरी विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य जनतेला, लोकांना माहिती व्हावी, यासाठी ‘पोलीस स्टेशनला भेट’ हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे….तसेच जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोलीस ठाण्यांना भेटी आयोजित केलेल्या आहेत…..त्यांना पोलीस खात्याच्या कामकाजा विषयी माहिती देण्यात आले असून माहिती देण्यात आहे. त्याचबरोबर पोलीसांकडील शस्त्रसाठ्याचे प्रदर्शनही भरविण्यात आले…. सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांच्या त्यांच्या हद्दीतील शैक्षणिक संस्थांना भेट देऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व अन्य कायद्यांविषयी मार्गदर्शन जनजागृती करणार आहेत… विषेशतः महिला व मुली यांचेवरील होणारे अत्याचार व बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या इत्यादी जनजागृती विषयक चर्चासत्रा घेण्यात येणार आहेत.. विविध गुन्ह्यात अनेकदा किंमती ऐवज गुन्हेगारांकडून जप्त केला जातो….असा मुद्देमाल कोर्टाच्या आदेशांने संबधित मालकाला दिला जातो….रेझिंग डे निमित्त असा मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत देण्याचे नियोजन करण्यात आले- आहे.*🕹️ पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा यांचे निर्देश मार्गदर्शनाखाली “रेझींग डे” निमित्याने आज दिनांक- 02-01-2025 रोजी खालील प्रमाणे कार्यक्रम- उपक्रम राबविण्यात आलेत* ➖👇📍 1) *पोलीस स्टेशन तिरोडा-* येथे वर्धापन दिनानिमित्त *वॉकथॅान* व *मिनी मॅराथॉन* स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते… स्पर्धेत 200 ते 250 स्पर्धक सहभागी झाले होते…उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा, तहसिलदार, मुख्याधिकारी न. प. तिरोडा यांचे हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. पो. स्टे. हद्दिमधील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, पत्रकार सादर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते… 📍 2) *आमगाव पोलीस स्टेशन*- येथे पोलीस रेझिंग डे निमित्त शाळकरी विद्यार्थ्यांची रॅली चे आयोजन करण्यात आले.. तसेच विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमध्ये चालणारे विविध कामकाज, आणि शस्त्र संबंधी माहिती देण्यात आली…📍3) *गोरेगाव पोलीस स्टेशन*- येथे पोलीस रेझिंग डे निमित्त शाहिद जाम्या- तिम्या हायस्कूल येथे कार्यक्रम घेवून पोलीस स्टेशन चे कामकाज व शस्त्रबाबत माहिती देण्यात आली ..📍 4) *जिल्हा वाहतूक शाखा, गोंदिया* यांचे तर्फे वाहतूकीचे सुयोग्य नियमन, जनतेची सुरक्षा, होणारी वाहतूक कोंडी, दुर्घटना टाळण्यासाठी अवंती चौक येथे नव्याने सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे….त्याचप्रमाने अवंतीबाई चौक, जयस्तंभ चौक, फुलचुर नाका, पतंगा चौक, येथील पोलीस बूथ कार्यान्वित करण्यात आले आहेत.
रिपोर्ट : जुबेर शेख