दिनांक- 17/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक हे पो. ठाणे रामनगर हद्दित अवैध धंदे, गुन्हेगार शोध, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी अंदाजे 17.00 वाजता चे सुमारास पोलीस ठाणे – रामनगर हद्दीतील *रेलटोली मालधक्का परिसरात रेल्वे स्टेशन कडून हनुमान मंदीर कडे जातांना एक ईसंम ट्रॉली बॅगसह संशयास्पद स्थितीत दिसून आल्याने त्यास थांबवून त्याची चौकशी विचारपूस केली असता ईसंम नामे- सतीश दीनानाथ उपाध्याय वय 25 वर्षे राहणार- तीलवारा घाट, ता. गोरखपुर , जिल्हा – जबलपूर ( म. प्र. )* असे सांगीतले…..त्याचे ताब्यात दोन ट्रॉली बॅग, व एक स्ल्याक बॅग दिसून आल्याने सदर बॅग मध्ये काय आहे..बाबत चौकशी केली असता सुरवातीस उडवा उडविचे उत्तरे देत असल्याने त्याचे ताब्यातील दोन्ही ट्रॉली व स्ल्याक बॅग ची पाहणी केली असता दोन ट्रॉली बॅग, व स्ल्याक बॅग मध्ये प्लास्टिक चे चिकट टेप पट्टी ने वेस्टन केले असलेले एकूण 14 नग पॉकिटे दिसून आलेत.. त्यापैकी एक वेस्टन असलेले पाकिट् उघडले असता त्यात पाने, फुले, फळे आणि बिया मिश्रित हिरव्या रंगाचा वनस्पती ओलसर गांजा दिसून आल्याने…..मा. वरिष्ठांचे दिशा निर्देश सूचनाप्रमाणे जप्तीची सविस्तर प्रक्रिया करण्यात आली… *ईसंम आरोपी नामे- सतीश दीनानाथ उपाध्याय वय 25 वर्षे* याचे ताब्यातून *28 किलो 120 ग्रॅम गांजा, दोन ट्रॉली बॅग, एक स्ल्याग बॅग असा किंमती एकूण 8,68, 630/- रु ( आठ लक्ष अडूषस्ठ हजार सहाशे तीस रूपयाचा मुद्देमाल)* जप्त करण्यात आलेला असुन *आरोपी नामे- 1) सतीश* दीनानाथ उपाध्याय वय 25 वर्षे व *2) फरार आरोपी नामे- भोला प्रकाश यादव* वय 20 वर्षे रा. दोन्ही तीलवारा घाट, ता.गोरखपुर, जिल्हा -जबलपूर (म.प्र.) यांचे विरूध्द पोलीस ठाणे – रामनगर येथे *एन. डी. पी. एस. कायदा कलम 8 (क),20, 29 अंन्वये* गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे….आरोपी सतीश दीनानाथ उपाध्याय यास जप्त मुद्देमालासह रामनगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे..पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया….गुन्ह्यांचा तपास रामनगर पोलीस करीत आहेत.. ▪️सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. संजय तुपे, मपोउपनि- वनिता सायकर, पोलीस अंमलदार राजेन्द्र मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, नेवालाल भेलावे, तुळशीदास लुटे, छगन विठ्ठले, संतोष केदार, राम खंदारे, लक्ष्मण बंजार यांनी कारवाई केली आहे..

रिपोर्ट : जुबेर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *