गोंदिया,दि.20:

सर्व शासकीय कार्यालयात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे, त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आरोग्य विभागाच्या पथकाने दि.18 डिसेंबर रोजी तंबाखु मुक्त युवा अभियान अंतर्गत बुधवारी पंचायत समिती गोंदिया येथील कार्यालयात धाडसत्र राबविण्यात आले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांच्या मार्गदर्शनात पंचायत समिती गोंदिया येथील विविध विभागात धाड टाकून 07 तंबाखू, गुटखा खाणाऱ्या व बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तंबाखू नियंत्रण कोटपा कायदा 2003 अंतर्गत दंडात्मक कारवाई करून आठशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.यावेळी कर्मचाऱ्यांकडे तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.ही कार्यवायी खंड विकास अधिकारी आनंद पिंगळे , जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.अनिल आटे, दंत शल्य चिकित्सक डॉ.अमोल राठोड, जिल्हा सल्लागार डॉ.ज्योती राठोड,मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम,सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर, दंत सहाय्यक विवेकानंद कोरे, पोलिस शिपाई रमेश कोल्हारे शहर पोलिस स्टेशन गोंदिया यांनी पार पाडली.जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अमलबजावणीसाठी आरोग्य विभागामार्फत पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.सर्व शासकीय कार्यालयात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे,त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांची तपासणी करण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग,नगर परिषद,तहसिल कार्यालये,पोष्ट ऑफिस यांचे सह विविध कार्यालयात झाडाझडती पुढील कालावधीत घेतली जाणार आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी सुद्धा येत्या पुढील दिवसात पंचायत समिती कार्यालये,शाळा, ग्रामपंचायत तंबाखुमुक्त करण्यासाठी वेगवेगळे पथकांची निर्मितीवर भर देणार असल्याचे सांगितले.

रिपोर्ट : जुबैर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *