गोंदिया,दि.२० डिसेंबर २०२४

१०६९ शाळा अद्यापही कॅमेराविना; राज्य सरकारच्या सूचनेनंतरही संबंधिताचे दुर्लक्ष

विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. शासनाने देखील तसे निर्देश दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील केवळ १३२ शाळांमध्येच तिसऱ्या डोळ्याच्या “वाच” म्हणून तब्बल १०६९ शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा राम भरोसे आहे.आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून पालक इतर खर्चात पदरमोड करून मुलांना चांगलं शाळेत पाठवितात. तेथे त्यांना अनुकूल आणि सुरक्षित वातावरण मिळेल आपल्या पाल्य सुरक्षित असेल अशी अपेक्षा बाळगून असतात.परंतु हजारो रुपयांचे शुल्क घेणाऱ्या खाजगी शाळांमध्ये सुरक्षेसह इतर सोयीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. सर्व शाळांना प्रवेशद्वार आहे. परंतु, त्या प्रवेशद्वारावर चौकीदार किंवा सुरक्षारक्षक फारच कमी ठिकाणी ठेवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षेतेच्या प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेत अनुचित घटना घडली तर त्याच्या उलगडा कसा लागणार?. असा प्रश्नही यापुढे आला आहे. काही शाळांमध्ये सोयी सुविधांचा अभाव आहे. राज्य शासनाने काही वर्षांपूर्वीच प्रत्येक शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले. परंतु बहुतांश शाळांनी या आदेशाला केराची टोपली दाखविली. जिल्ह्यातील १६६४ शाळांपैकी केवळ १३२ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले तर,इतर शाळांची सुरक्षा सध्या भगवान भरोसे असल्याचे चित्र आहे.खाजगी शाळा सोडाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १०६९ शाळांमध्ये ही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. अनेक शाळांना सुरक्षा भिंत नाहीत. तर काही शाळांमध्ये स्वच्छतागृहाचा अभाव आहे. काही शाळांमधील स्वच्छतागृहाची नियमित सफाई केली जात नाही. तर काही स्वच्छतागृहाची दरवाजेच गायब झाल्याचे चित्र आहेत. त्यामुळे विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे.

रिपोर्ट : जुबैर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *