




शनिवार दिनांक- २०/०९/२०२५
दिनांक १५/०९/२०२५ ते दिनांक १९/०९/२०२५ पर्यंत पोलीस मुख्यालय कवायत मैदान (कारंजा) गोंदिया येथे २४ वी जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये देवरी उपविभाग, आमगाव उपविभाग, तिरोडा उपविभाग, गोंदिया उपविभाग व पोलीस मुख्यालय गोंदिया असे ५ संघ सहभागी होते. स्पर्धेत फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, कबडडी या सांघिक खेळाचा समोवश तसेच वैयक्तिक खेळामध्ये, ज्युडो, कुस्ती, वेटलिफ्टींग व अथलेटीक्स ईत्यादी खेळांचा समावेश होता.दिनांक १९/०९/२०२५ रोजी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या शुभ हस्ते गोंदिया जिल्हा पोलीस क्रीडा २०२५ कार्यक्रमाचे समारोप व बक्षीस वितरणाचे कार्यक्रम पार पाडण्यात आला. मा. पोलीस अधीक्षक यांनी स्पर्धेत उपस्थितांना संबोधित करुन गोंदिया जिल्हा पोलीस दलातील खेळाडू पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे खेळातील प्राविण्य वृध्दींगत करण्यासाठी तसेच त्यांच्या खेळ गुणांना प्रोत्साहन व वाव मिळावा व त्यांच्यामध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. अतिशय खेळामेळीच्या वातावरणात जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा पार पाडलेल्या असुन या क्रीडा पार पाडण्यामध्ये आपल्या सर्वांचे योगदान मोलाचे आहे. क्रीडा स्पर्धेत पुरुषामध्ये जनरल चॅम्पीयनशिप पोलीस मुख्यालय गोंदिया संघ व महिलामध्ये सुध्दा पोलीस मुख्यालय गोंदिया संघ हे विजेते ठरल्याने सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करुन व खेळाडूंनी भंडारा येथे होणाऱ्या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी व त्यानंतर राज्यस्तरावर होणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत भरघोस यश मिळवून गोंदिया जिल्हयाचे नाव उज्वल करावे असे संबोधित केले. सदर कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक गोंदिया (कॅम्प देवरी) श्री अभय डोंगरे, उपविभायीय पोलीस अधिकारी देवरी श्री विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा श्री साहिल झरकर, स्था. गु. शा. गोंदिया चे पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर , प्र. पोलीस उप-अधीक्षक गोंदिया श्री रामदास शेवते, राखीव पोलीस निरीक्षक श्री राजेश सरोदे, राखीव पोलीस उप-निरीक्षक श्री दिपक शेंडे व जिल्यातील ठाणेदार तसेच इतर पोलीस अधीकारी/अंमलदार, लिपीक वर्गीय मोठया संख्येने उपस्थित होते.सदर क्रीडा स्पर्धेचे सुत्र संचालन सेवानिवृत्त शिक्षिका मंजुर्षी देशपांडे व आभार प्रदर्शन प्र. पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) श्री रामदास शेवते यांनी केले. सदर क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याकरिता प्र. पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) श्री रामदास शेवते, रापोनि राजेश सरोदे, रापोउपनि दिपक शेंडे, श्रेणी पोउपनि रोशन उईके, सफौ मुस्तफा सरवर, दिपक दत्ता, पोहवा पंकज पांडे, लियोनार्ड मार्टिन, चंद्रकांत बरकुंड, हुर्मेंद्र चौधरी, संतोष चौधरी, मपोहवा मंगला प्रधान, पोहवा दत्ता राठोड, राज वैद्य व पोकॉ राकेश उके तसेच पोलीस मुख्यालय गोंदिया येथील स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले.
रिपोर्ट : जुबेर शेख
