बुधवार दिनांक- १७/०९/२०२५ ………..जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मा. श्री. प्रजित नायर, यांचे दिनांक १६/०९/२०२५ रोजीचे (एम. पी. डी. ए.) अंतर्गत स्थानबद्धते चे आदेश

कुख्यात गुंड नामे- सारूख खान उर्फ शाहरुख फरीद खान पठाण वय ३२ वर्ष राहणार गड्डाटोली, गोंदिया याचेवर ( एम.पी.डी.ए.) अंतर्गत कारवाई ( एक वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह, बुलढाणा जिला कारागृहत येथे केले स्थानबध्द )

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस स्टेशन रामनगर हद्दद्दीतील धोकादायक गुंड इसम नामे- सारूख खान उर्फ शाहरुख फरीद खान पठाण वय ३२ वर्ष राहणार गड्डाटोली, गोंदिया हा पोलीस ठाणे रामनगर हददीमध्य खुनाचा प्रयत्न, गैर कायदयाची मंडली जमवुन शासकिय लोकसेवकावर हमला करने, जबरी चोरी, खंडनी, अवैध शस्त्र इत्यादि बाबतचे गुन्हे करीत असल्याने सदर इसमांविरुद्ध पोलीस ठाणे रामनगर येथे विविध प्रकारच्या ७ गंभीर गुन्ह्याची नोंद आहेत.

सदर कुख्यात गुंड इसम हा रात्री अपरात्री आपल्या हातामध्ये घातक हत्यारे बाळगणे, शस्त्रे घेवुन पोलीस ठाणे रामनगर हद्दीतील गरीब कामगार, सर्वसामान्य नागरीक, सर्वसामान्य व्यवसायिक तसेच व्यापारी यांना हत्याराचा धाक दाखवुन लोकांमध्ये दहशत माजवुन त्यांना मारहाण करून लुटण्याचे काम करीत असल्यामुळे या भागातील नागरीक भयग्रस्त झाले असल्याने त्यांना आपले दैनंदिन कामकाज करणे सुध्दा भितीदायक झाले होते. त्याचे असे कृत्यामुळे , मोहल्यातील नागरिकांना त्याचेपासुन धोका निर्माण झाला होता. सार्वजनिक ठिकाण, शासकीय कार्यालय करणा-यांना सुध्दा आपले दैनंदीनी कामकाज करणे अवघड झाले होते. तसेच त्याचे विरोधात गेल्यास तो आपल्याला धमकावुन जिवानीशी ठार मारेल अशी भिती सुध्दा त्यांचे मनात निर्माण करुन त्याने रामनगर पोलीस स्टेशन परिसरात आपली दहशत निर्माण केली होती. त्याचेवर वारंवार गुन्हे नोंद तसेच प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्याचेवर कोणताच बदल झाला नसल्याने त्याने आपली गुन्हेगारी प्रवृत्ती सुरूच ठेवली होती. त्याचेविरुध्द करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा भंग करून स्थानबध्द इसम हा पुन्हा गुन्हे करीत होता. यावरून त्यास प्रचलित कायदयाची कोणतीही भिती नसल्याचे दिसुन येत होते. तसेच पोलीसांनी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांनी वेळोवेळी केलेल्या कायदेशिर कारवाईचा सकारात्मक परीणाम स्थानबध्द इसमाचे वर्तणुकीत झाला नव्हता. उलट दिवसागणित त्याचे अवैध कृत्ये वाढत चाललेली होते. त्यामुळे कलम 3 (1) महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले व औषधी द्रव्ये विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, अवैध वाळु तस्करी करणारे तसेच अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 (सुधारीत 2015) नुसार मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी साो. गोंदिया. यांचेकडे “धोकादायक व्यक्ती” अन्वये एका वर्षाकरीता स्थानबध्दतेचा आदेश होणेस प्रस्ताव पाठविला असता मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. प्रजित नायर, सा. यांनी इसम नामे- सारूख खान उर्फ शाहरुख फरीद खान पठाण वय ३२ वर्ष राहणार गड्डाटोली, गोंदिया यास आदेश क्र. अ . का. गृह /५२२/२०२५ दिनांक १६/०९/२०२५ रोजी चे आदेशान्वये मध्यवर्ती कारागृह, बुलढाणा जिला कारागृह येथे स्थानबध्दतेत ठेवण्याचे आदेश निर्गमीत झाल्याने सदर इसमास मध्यवर्ती कारागृह, बुलढाणा जिला कारागृहत येथे दाखल करण्यात येत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. अभय डोंगरे ,अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्रीमती रोहिणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया , श्री साहिल झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांचे निर्देशाप्रमाणे स्था. गु. शा. गोंदिया चे पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर यांचे प्रभावी मार्गदर्शखाली पोलीस ठाणे रामनगर पोलीस निरिक्षक श्री. प्रवीण बोरकुटे , स्थानिक गुन्हे शाखा गोदिया येथील प्रतिबंधक सेलचे म.पो. उप. नी. वनिता सायकर, अंमलदार पो.हवा. प्रकाश गायधने, पो.हवा. संजय चव्हाण, पो.हवा. सोमेन्द्रसिंग तुरकर, पो.हवा. दुर्गेश तिवारी, पो. शि. छगन विठ्ठले, पो. शि दुर्गेश पाटील, पो. शि. संतोष केदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्या. तिरोडा येथील अंमलदार लितेश गोस्वामी , पो. ठाणे रामनगर पोउपनि अमोल वाघमोडे , पोहवा राजेश भगत, यांनी कार्यवाही पार पाडली

सदर कारवाईमुळे पोलीस ठाणे रामनगर परिसरातील गुन्हेगारांमध्ये चांगलीच दहशत पसरली असुन सदर कारवाईचे परिसरातील लोकांनी स्वागत कौतुक केले आहे।

रिपोर्ट : जुबेर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *