गोंदिया, दि.२७ स्थानिक गुन्हे शाखा, व पो. ठाणे तिरोडा पोलीसांची संयुक्त कामगिरी. दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजीचे ९:३० वा.चे सुमारास घटना ठिकाण- मौजा भिवापूर नाल्याजवळ, खुल्या जागेत डांबरी रोडालगत मृतक नामे – सुनील चंद्रकुमार तुमडे वय ३२ वर्षे रा. भुराटोला ता. तिरोडा यास कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी अज्ञात कारणावरून कोणत्यातरी हत्याराने मृतकच्या डोक्यावर वार करून जिवानिशी ठार केल्याचे मृतकची आई फिर्यादी नामे- चंद्रकला तुमडे रा. भुराटोला, ता. तिरोडा जिल्हा गोंदिया यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे तिरोडा येथे अपराध क्रमांक- ८४५/२०२४ कलम १०४(१) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये दि.२५ नोव्हे.२०२४ रोजी चे ३:१५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.. सदर खून प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी सदर प्रकरणातील अज्ञात गुन्हेगारांचा कशोशिने शोध घेवून गुन्हेगारांना तात्काळ जेरबंद करून खून प्रकरणाचा उलगडा करण्याचे निर्देश पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा, तसेच पो.नि. पो . ठाणे तिरोडा यांना दिले होते.

मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा,श्री.साहिल झरकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे पोलीस पथक आणि पोलीस निरीक्षक , तिरोडा यांचे मार्गदर्शनात तिरोडा पोलीस पथक अशी विविध पथके सदर खून प्रकरणाचा उलगडा करण्याकरीता नेमण्यात आलेली होती.अज्ञात आरोपीतांचे शोधाकरिता गोपनीय माहितगार नेमण्यात आले होते. अज्ञात आरोपीतांचा शोध करीत असताना घटनास्थळावरून प्राप्त माहीती परिसरातील नागरिकांची केलेली विचारपूस व मृतकचा पूर्व इतिहास आणि नेमण्यात आलेले गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खुनात सहभागी असलेली आरोपी मुलगी नामे-वैष्णवी गणेश सुरणकर वय १९ वर्षे रा. भिवापूर ता. तिरोडा, जिल्हा गोंदिया हिस गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेण्यात आले आहे. वैष्णवी हिला खून प्रकरण संबंधात सखोल चौकशी विचारपूस केली असता तिने खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आरोपी नामे-मंगेश माणिकचंद रहांगडाले वय २४ वर्षे रा.भुराटोला ता.तीरोडा, जिल्हा गोंदिया असल्याचे सांगितले यावरून आरोपी मंगेश रहांगडाले यास मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले.दोघांनाही जेरबंद करून खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. नमूद दोन्ही आरोपीतांना गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवुन सखोल विचारपूस चौकशी केली असता प्राथमिक तपासात- यातील मुख्य आरोपी मंगेश रहांगडाले याचे भावाचा यातील मृतक व मृतकाचे वडील यांनी मागील वर्षी खून केला होता.त्याचा राग आरोपी मंगेश याचे मनात असल्याने त्यानी मृतकाचे काटा काढण्याचे ठरवून त्याची मैत्रीण आरोपी वैष्णवी हिला मृतक सोबत Instagram या समाज माध्यमाद्वारे मैत्री करायला लावून मृतक यास घटनेदिवशी रात्रीला Instagram च्या द्वारे घटनास्थळी भेटायला बोलावले होते. व आरोपी मंगेश याने भावाच्या खूनाचा बदला म्हणुन मृतक यास कुऱ्हाडीने डोक्यावर मारून खून केल्याचे सांगितले असून प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.. गुन्ह्यातील दोन्ही आरोपीतांना मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीतांचा दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे..

मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयात आणखी आरोपींचा सहभाग आहे किंवा कसे, मृतक यास जिवे ठार मारण्याचा मुख्य उद्देश काय, आणि गुन्ह्याचे अनुषंगाने ईतर महत्वाच्या बाबी विचारात घेता पुढील सखोल तपास स.पो.नि. कवडे पो.स्टे. तिरोडा हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा यांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा श्री. साहिल झरकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि.श्री.दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात सपोनि-संजय तुपे, मपोउपनि-वनिता सायकर, पोलीस अंमलदार- प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, सुबोध बिसेन, इंद्रजीत बिसेन, चित्तरंजन कोडापे सुजित हलमारे, रियाज शेख, छगन विठ्ठले, संतोष केदार, दुर्गेश पाटील, राम खंदारे, मुरली पांडे स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया तसेच पो.नि.श्री. अमित वानखेडे पो. ठाणे तिरोडा यांचे नेतृत्वात- सपोनि संजय कवडे, पोउपनि तेजस कोंडे, अंमलदार योगेश कुळमते, सुर्यकांत खराबे, निलेश ठाकरे, शैलेश पटले, उत्तरेश्वर घुगे, अमित गायकवाड, यांनी कामगिरी केलेली आहे.

रिपोर्ट : जुबैर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *