गोंदिया, दि.7 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने 66-आमगाव विधानसभा मतदारसंघात मतदान पथकाची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचे द्वितीय प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी येथे 13 व 14 नोव्हेंबर 2024 रोजी दोन सत्रात होणार आहे. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी प्रथम सत्रात 350 व दुपारी द्वितीय सत्रात 350 मतदान अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण घेणार आहेत. तसेच 14 नोव्हेंबर रोजी सकाळी प्रथम सत्रात 350 व दुपारी द्वितीय सत्रात 350 मतदान अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण घेणार आहेत. असे एकूण 1400 अधिकारी/कर्मचारी यांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हाताळणी प्रशिक्षणासह मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया विषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच सदर दिनांकाला टपाली मतपत्रिकाचे मतदान करण्यासंबंधी सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आलेली असून मतदान पथक यांनी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाला मतदान अधिकारी यांनी उपस्थित राहण्याबाबत आमगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी यांनी सूचित केले असून गैरहजर राहणाऱ्या मतदान अधिकारी/कर्मचारी यांचेवर लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये कार्यवाही करण्यात येणार आहे. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड यांनी कळविले आहे.

रिपोर्ट : जुबेर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *