*दिनांक 17/04/2025* मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 15 ऑक्टोंबर, 2024 रोजी महाराष्ट्र राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित केला असता सदर निवडणूक बंदोबस्त करीता कर्तव्यावर असतांना सफौ/1370 श्री. रविकिरण प्रताप पुराम यांचा मृत्यू झाल्यामुळे मा. भारत निवडणूक आयोगाचे पत्र दिनांक 09 मार्च, 2023 च्या पत्रामध्ये दिलेल्या निर्देशानुसार “निवडणूकीच्या कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी /कर्मचाऱ्यांना तसेच गंभीर दुखापतीमुळे कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्यांना आणि मृत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देणेबाबत” तरतुद करण्यात आलेली आहे.त्याअनुषंगाने, दिवंगत सफौ / 1370 श्री रविकिरण प्रताप पुराम यांचे कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान मंजुर करण्याबाबत मा. जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया व मा. पोलीस अधिक्षक, गोंदिया यांच्या संयुक्त प्रस्तावांच्या अनुषंगाने मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या मंजुरीनुसार दिवंगत सफौ / 1370 श्री रविकिरण प्रताप पुराम यांचे पत्नी श्रीमती सुरेखा रविकिरण पुराम यांना आज दिनांक 17 एप्रिल, 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया यांच्या शुभहस्ते सानुग्रह अनुदाना ची रक्कम 15,00,000/- रुपये रकमेचे धनादेश प्रदान करण्यात आले आहे

रिपोर्ट : जुबेर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *