
*दिनांक 17 एप्रिल 2025* *पो ठाणे रामनगर, गोंदिया पोलीसांची स्तुत्य कामगिरी-* याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक ०४/०४/२०२५ रोजी सकाळी १०.०० वा चे सुमारास पो.स्टे. रामनगर परिसरात पेट्रोलींग दरम्यान पोशि/विपुल नागदेवे पो.स्टे. रामनगर यांना एक अज्ञात महिला आपली लहान मुलगी (वय अंदाजे १ ते १.५ वर्ष) सह आढळून आली. सदर महिला व लहान मुलीस पो. स्टे. रामनगर येथे घेऊन आल्यानंतर सदर महिला हिच्याकडे परि. मपोउपनि काजल नामदे यांनी विचारपुस केली असता त्या महिलेने आपले नाव- सुनिता तेजावत असल्याचे सांगितले व तिच्याकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याचे व प्रवासा दरम्यान मोबाईल चोरिला गेला असल्याचे सांगितले. आपला स्पष्ट पत्ता सांगत नसल्याने तात्पुरत्या निवा-याकरिता दि. ०४/०४/२०२५ रोजी संध्याकाळी सदर महिला व लहान मुलीस सखी वन स्टाप सेंटर, के.टी.एस रुग्णालय, गोंदिया येथे दाखल करण्यात आले. दि. ०९/०४/२०२५ रोजी पो. स्टे. रामनगर येथे आणुन सदर महिलेस परत विचारपुस केली असता तिचे नाव सुनिता देविसिंग तेजावत असल्याचे व तिचे पती डबरापारा, राज्य – छत्तीसगड, हैद्राबाद राज्य- तेलंगणा येथे राहत असल्याचे सांगितले. असे विविध पत्ते सांगितल्याने छत्तीसगड व तेलंगना पोलीस यांच्यशी संपर्क साधुन सदर ठिकाणी मिसींग रिपोर्ट दाखल आहे किंव्हा कसे याबाबत चौकशी करण्यात आली परंतु तिथे कोणताही मिसींग रिपोर्ट दाखल नव्हता सदर महिलेला विश्वासात घेऊन विचारपुस केली असता तिने आपले आई नामे जानकी भोये वडिल नामे-दिना भोये हे चटुंका राज्य ओडिशा येथे राहत असले बाबत सांगितले. सदर माहिती वरुन गाव- चटुंका तह- कंटाबांजी, जिल्हा- बालंगीर, राज्य- ओडीसा येथिल स्थानिक पोलीसांशी पोलीस निरिक्षक प्रविण बोरकुटे सा., पो. स्टे. रामनगर यांनी संपर्क साधुन जानकी भोये व दिना भोये चटुंका येथे राहत असलयाबाबत खात्री केली व त्यांस त्यांची मुलगी सुनिता तेजावत गोंदिया येथे असल्याचे कळविले असता त्यांनी सुनिता तेजावत यांचे पति देविसिंग तेजावत यांचा मोबाईल क्र. देऊन संपर्क करण्याचे सांगितले. पति देविसिंग तेजावत रा. जैनुर, असिफनगर, हैद्राबाद राज्य – तेलंगना यांच्याशी फोन द्वारे संपर्क केला असता त्यांनी आपली पत्नी बाळांतपणासाठी ओडीसा येथे तिची आई जानकी भोये यांचे कडे गेली होती व जन्म झालेले लहान बालक मृत झाल्याने व आई सोबत भांडन झाल्याने सुनिता घरातुन कोणालाही न सांगता निघुन गेल्याचे सांगितले त्यावरुन आज दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी रामनगर पोलीसांनी मिळून आलेली महिला- सुनिता तेजावत व लहान मुलगी देविना हिस तिचे पती श्री. देविसिंग तेजावत यांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे..
रिपोर्ट : जुबेर शेख
