
*दिनांक 5 एप्रिल 2025* दिनांक 6 एप्रिल रोजी साजरी होणारी श्रीराम नवमी उत्सव व दिनांक 14 एप्रिल रोजी साजरा होणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निर्विघ्नपने शांततेत व सौहार्द्र पूर्ण वातावरणात पार पडावे या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यांनंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया, श्रीमती रोहिणी बानकर, यांचे निर्देश सूचना प्रमाणे दिनांक 4/4/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण बोरकुटे, पो.स्टे. रामनगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पो. स्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना…एक इसम हा आपले हातात तलवार घेऊन फिरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या आधारे कारवाई करत त्या इसमाचा शोध घेवून *आरोपी नामे दुर्गेश सुनील खोब्रागडे राहणार कुडवा* हा त्याचे हातात एका मोठ्या लोखंडी तलवारीसह फिरत असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले…. त्याचे विरुद्ध पो ठाणे रामनगर येथे भारतीय हत्यार कायदा चे कलम 4, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई तपास प्रक्रिया पो हवा सरोज घरडे हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री प्रवीण बोरकुटे गुन्हे अन्वेषण पथकातील अंमलदार राजू भगत, सुनील चव्हाण, सरोज घरडे, कपिल नागपुरे, यांनी केली आहे ..
रिपोर्ट : जुबेर शेख