
*दिनांक 5 एप्रिल 2025* **पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या निर्देशान्वये पो. ठाणे रामनगर पोलसांची हद्दपारीची कारवाई** पो. स्टे रामनगर हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगार *इसम नामे- प्रतिक उर्फ बंटी मुन्ना मेश्राम राहणार रेलटोली गोंदिया* याचेवर पो. स्टे. रामनगर येथे हद्दीत मारपिट करणे, शिवीगाळ करणे, अवैधरीत्या दारू विक्री करणे, अवैध शस्त्र बाळगणे, चोरी, घरफोडी गैर कायद्याची मंडळी जमवून तोडफोड करणे, असे गंभीर स्वरूपाचे अपराध दाखल असून त्याचेवर वारंवार प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा त्याचे वागणुकीत चरित्रात कोणताही बदल वा सुधारणा झाली नाही.. त्या उलट तो पुन्हा पुन्हा गुन्हेगारी कृत्य करीत असल्याने त्यास आगामी सण उत्सव, नगर परिषद निवडणूक यामध्ये कोणतेही अपराधी कृत्य करू नये ज्यामुळे कायदा व सुव्येवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही त्याचे गुन्हेगारी प्रवृत्तीवर कृतीवर आळा बसावा याकरिता मा. श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया, अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री नित्यानंद झा, उपविभागीय अधिकारी गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर, पोलीस निरीक्षक लबडे स्थागुशा गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे व गुन्हे अन्वेषण पथक चे अधि.व कर्म पो. स्टे.रामनगर यांनी सदर गुन्हेगाराविरुद्ध हद्दपार प्रस्तावाची कार्यवाही केल्याने गुन्हेगार नामे प्रतीक उर्फ बंटी मुन्ना मेश्राम यास माननीय उपविभागीय दंडाधिकारी गोंदिया यांनी तीन महिन्याकरिता गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार केले आहे..
रिपोर्ट : जुबैर शेख