*दिनांक- 02 एप्रिल 2025**आरोपी- दुर्गेश उर्फ भुऱ्या देवकरण भगत, वय 23 वर्ष, रा. कटंगीकला गोंदिया असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या मोटर सायकल चोरट्यांचे नाव आहे.* . याबाबत थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी श्री. रेखराम नदलाल पारधी, राहणार. गणखेरा, ता. गोरेगाव जिल्हा- गोंदिया यांनी दिनांक 13/04/2024 रोजी तक्रार दिली की, ते आपले मोटार सायकल एच.एफ. डिलक्स ने गोंदिया येथे दुध वाटप करण्यास आले असता माता मंदिरजवळ सिव्हिल लाईन, गोंदिया येथे मोटार सायकल उभी करुन दुध वाटप करण्यास गेले असता कोणीतरी अज्ञात आरोपीने त्यांची मोटार सायकल एम. एच. 35 एसी 5965 किंमती 40,000/- रु.ची चोरुन नेल्याचे फिर्यादीचे तक्रारी वरुन पो. स्टे. गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक 245 / 2024 कलम 379 भादंवि चा गुन्हा दाखल करुन तपास करण्यात आला. सदर गुन्ह्याचे तपासात आरोपीचा शोध घेवुन आरोपी नामे- दुर्गेश उर्फ भुऱ्या देवकरण भगत, वय 23 वर्ष, रा. कटंगीकला गोंदिया यास अटक करुन गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आली, आरोपी विरुध्द सबळ साक्ष पुरावे गोळा करण्यात आले, सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन आरोपी विरुध्द दोषारोपपत्र मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया येथे सादर करुन फौजदारी खटला क्रमांक 291/2024 प्रमाणे खटला चालविण्यात आला.सदर गुन्ह्याचे खटल्याचे सुनावणीत *आरोपी- दुर्गेश उर्फ भुऱ्या देवकरण भगत, वय 23 वर्ष, रा. कटंगीकला गोंदिया* याचे विरूध्द सबळ साक्ष पुराव्यावरून दोषसिध्द झाल्याने मा. मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. अभिजीत कुलकर्णी साहेब , न्यायालय गोंदिया यांनी आज दिनांक 02/04/2025 रोजी आरोपीस 2 वर्ष सश्रम कारावास व 1,000/- रू. द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.सदर शिक्षा झालेल्या गुन्हयाचा तपास पोहवा. जागेश्वर उईके पो. स्टे. गोंदिया शहर यांनी केला असून सदर खटल्याचे युक्तीवाद सहायक सरकारी अभियोक्ता श्री. कमलेश दिवेवार यांनी केले तर न्यायालयीन पैरवी कामकाज पो. हवा. ओमराज जामकाटे यांनी पाहिले.सदर गुन्ह्याचे उत्कृष्ट तपासाबाबत तसेच गुन्ह्याचे तपास कामात सहकार्य करणारे पोलीस अधिकारी अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक,गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया, श्रीमती रोहिणी बानकर, पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे ठाणेदार, पोलीस निरिक्षक श्री. किशोर पर्वते यांनी कौतुक केले आहे.
रिपोर्ट : जुबेर शेख