


महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग GAD-49022/ 65/ 2024-GAD (DESK -29) दिनांक- 27/12/2024 शासन निर्णय तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुबंई यांचे पत्र क्र पामसं/36/र.व.का./(8300) शा.नि. अधिसुचना/01/2023 मुंबई दिनांक – 30/12/2024 अन्वये सन-2025 मध्ये सर्व शासकिय कार्यालयात राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ती संत व सुधारक यांची जयंती साजरी करण्यात यावी. असे निर्देश आहेत त्या अनुषंगाने त्याअनुषंगाने मा. श्रीमती नंदिनी चानपुरकर, प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (मुख्या.) गोंदिया यांचे शुभ हस्ते दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमीत्त त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमात प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (मुख्या.) श्रीमती नंदिनी चानपुरकर, पोउपनि श्रीकांत हत्तीमारे तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्ट : जुबेर शेख
