⏩ गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयातील जनतेच्या हिताकरीता, जनतेच्या कल्याणाकरीता कायम अग्रेसर राहुन विविध कल्याणकारी नाविण्यपूर्ण उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणुन पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांच्या संकल्पनेतुन आणि अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया (कॅम्प देवरी) मा. श्री. नित्यानंद झा, यांच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी *” फिरते सायबर दूत “* वाहनाचे चे लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मुख्यालय (कारंजा) गोंदिया येथे करण्यात आले होते. दिवसेंदिवस सायबर अपराधापासून बऱ्याच लोकांची फसवणूक होत आहे व दिवसागणिक सायबर अपराध ही समस्या उग्र रूप धारण करत आहे… यावर पायबंद व्हावा, यापुढे लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून व गोंदिया जिल्ह्यातील नागरिक हे सायबर साक्षर व्हावेत या उद्देशाने “फिरते सायबर दूत ” वाहनाचे उदघाटन मा. नामदार डॉ. श्री. पंकज भोयर, राज्यमंत्री गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, महाराष्ट्र शासन यांचा हस्ते पार पडला.. *”फिरते सायबर दूत वाहन”* हे गोंदिया जिल्ह्यातील वर्दळीच्या ठिकाणी जसे – बाजार, चौक तसेच बस स्थानक या ठिकाणी जाऊन व्हिडीओ द्वारे तसेच पोस्टर व बॅनर द्वारे लोकांना सायबर साक्षर करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे मा. नामदार डॉ. श्री. पंकज भोयर राज्यमंत्री, यांनी कौतुक केले आहे व गोंदिया जिल्हा पोलीस दलास पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या आहेत. सदरचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याकरिता सायबर सेल गोंदिया, येथील अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर, सपोनि ओमप्रकाश गेडाम,पोलीस अंमलदार संजय मारवाडे, प्रमोद सोनवाने, रोशन येरणे, योगेश रहीले, अश्विन वंजारी, राधेश्याम कांबळे, रमेश हलामी , महीला पोलीस अंमलदार वंदना बिसेन, राजश्री घोंगे, शितल कोचे, किरण गायकवाड यांनी परिश्रम घेत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *