*दिनांक- 12 जानेवारी 2025*

मौजा- घाटकुरोडा व घोगरा येथील नदी पात्राजवळ किनाऱ्यावर अवैधरित्या टिप्पर आणि पोकलॅंडच्या साहाय्याने रेतीसाठा आणि वाहतूक करणाऱ्या यंत्रसामुग्रीवर गोंदिया जिल्हा महसूल व पोलीस प्रशासनाची जप्तीची कारवाई*.*4 टिप्पर, 7 पोकलॅण्ड यंत्रसामुग्री, असा एकूण किमती- 3,42,00,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त… 4 टिप्पर, 7 पोकलॅण्डचे अनोळखी चालक -मालक अश्या 11 आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल…**⏩. याबाबात थोड्क्यात माहिती अशी की, गोंदिया जिल्हयात प्रामुख्याने तिरोडा परिसरात वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे होणारे अवैध उत्खनन आणि रेतीची अवैधरित्या होणारी चोरी आणि वाहतूक तक्रारीच्या अनुषंगाने.. दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता मा. जिल्हाधिकारी श्री प्रजीत नायर, महोदय तसेच मा, पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे,यांनी प्रत्यक्ष गोंदिया जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचे पथक व तहसिल कार्यालय तिरोडा, पोलीस ठाणे तिरोडा येथील अधिकारी व अंमलदार, कर्मचारी पथकासह मौजा- घाटकुरोडा व घोगरा येथील वैनगंगा नदीपात्रावर भेट देऊन रेतीसाठा करून ठेवलेल्या ठिकाणी नदी किणाऱ्यापासुन अंदाजे 70 ते 100 मीटर अंतरावर टिप्पर आणि पोकलँन्ड यंत्र सामुग्रीच्या साहाय्याने रेतीचे उख्खनन व वाहतुक होत असल्याचे मौक्यावरुन आढळुन आल्याने वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाद्वारे जप्तीची कारवाई करण्यात आली आहे… 🕹️ वैनगंगा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती चे उत्खनन, रेतीचा साठा, वाहतूक करण्याचे उद्देशाने उभे असलेल्या 4 टिप्पर व 7 पोकलँन्डचे चालक- मालक यांच्यावर पोलीस ठाणे तिरोडा येथे फिर्यादी श्री. नारायण ठाकरे, तहसीलदार तिरोडा यांचे तक्रारीवरून अवैधरित्या रेती चोरी करण्याचे प्रयत्ना चे प्रकरण संबंधात अपराध क्रमांक- 043/2025 कलम 303(2), 62, 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे…..सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. वरिष्ठांच्या निर्देश सूचना आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक पो.ठाणे तिरोडा अमित वानखडे, यांचे मार्गदर्शनात पो उप नि कोंडे करीत आहेत..🕹️.सदरची कार्यवाही मा. जिल्हाधिकारी श्री. प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, यांचे प्रत्यक्ष उपस्थित व मार्गदर्शनात तहसीलदार तिरोडा श्री. नारायण ठाकरे, पोलीस निरीक्षक तिरोडा श्री. अमित वानखडे, नायब तहसीलदार तिरोडा श्री. ए.पी. मोहनकर, मं. अ. मुडीकोटा- श्री.पी.बी. निमजे, कु.बी.डी. पटले तलाठी घोगरा, श्री. सजु बान्ते बीट अंमलदार मुडीकोटा, श्री.ए.पी. भुते तलाठी- सराडी, मुडीकोटा, नवेगाव खुर्द श्री. रत्नदिप प्रकाश चौरे कोतवाल घोगरा यांनी सदरची कार्यवाही केली आहे..🕹️ सदरची कारवाई प्रक्रिया दुपारी- 12.00 वा. ते रात्री उशिरापर्यंत करण्यात आलेली…असून जप्तीपत्राप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आले.. 07 पोकलॅन्ड यंत्र सामुग्री हे मौक्यावरुन हलविणे शक्य नसल्याने त्यांचे मालक व चालक यांच्या तात्पुरत्या सुर्पदनाम्यावर देण्यात आलेत व 4 टिप्पर तहसिल कार्यालय येथे हलविण्यात येवून तिरोडा तहसिलच्या आवारात लावण्यात आले. 🕹️ याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेतर्फे, गोंदिया जिल्ह्यातील इतर रेती घाट परिसरात बेकायदेशीर रित्या आढळून आलेल्या वाळूसाठा, डम्प चे पंचनामे करून त्याबाबत कार्यवाही करिता अहवाल महसूल विभागाकडे सादर करण्यात आले आहेत..

रिपोर्ट : जुबैर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *