*दिनांक- 5 जानेवारी 2025* * 🕹️आजच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात पोलीस दलातील पोलीस अधिकारी- पोलीस अंमलदार अहोरात्र 24 तास आपले कर्तव्य बजावीत असतात त्यामुळे अनियमित जीवनशैली मुळे त्यांना विविध प्रकारचे आजार विकार जडले जात असुन विविध कारणाने पोलीस अधिकारी – अंमलदारांची ताण- तणावाची पातळी वाढलेली आहे…. त्यांचे शरीर निरोगी राहावे व ताण- तणावापासुन ते मुक्त राहावे…….या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांच्या पुढाकाराने दिनांक- 02/01/2025 ते दिनांक 04/01/2025 असे 03 दिवस पोलीस मुख्यालय गोंदिया कारंजा येथील प्रेरणा सभागृहात योगा व ध्यान साधना शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते… सदर शिबीरात योगा फॉऊंडेशन गोंदिया येथील डॉ. विद्या दयानी, योग शिक्षिका व त्यांचे टिम राहुल गुप्ता, प्रिती सिंगानीया व कोमल बादलानी यांचे मार्गदर्शनात योगा व ध्यान साधना घेण्यात आली….. शिबीरात डॉ.विद्या दयानी, योग शिक्षिका यांनी पोलीस अधिकारी अंमलदार यांना योगा व ध्यान साधनाचे महत्व समजावुन सांगून योगा व ध्यान साधना ही निर्सगाने पुरातन काळापासुन मानवाला दिलेली एक अतिशय महत्वाची आणि मौल्यवान देणगी आहे…, जी मनुष्याला आयुष्यभर निसर्गशशी जोडलेली ठेवते…. मानवी जीवनासाठी योगा व ध्यानाद्वारे मनाचा नकारात्मक अवस्थेतुन शांतता व शुध्दीकरण होवुन मनुष्याचे मन एकाग्र होत असल्याचे सांगुन त्यांनी व त्यांचे टिमनी योग प्रात्याक्षिके करुन दाखविले व तद्नंतर उपस्थित एकुण 75 ते 80 च्या संख्येने पोलीस अधिकारी- अंमलदार यांनी योग आसनांचा व ध्यान साधनाचा लाभ घेतला. सदर शिबीराचे सुत्र संचालन व आभार पोहवा राज वैद्य यांनी व्यक्त केले… सदर शिबीर यशस्वीपणे पार पाडण्याकरिता पोलीस उप-अधिक्षक (मुख्या) श्रीमती नंदिनी चानपुरकर, पो.नि रामेश्वर पिपरेवार, राखीव पोलीस निरीक्षक रमेश चाकाटे, श्रेणी पोउपनि रोशन उईके, मपोहवा मंगला प्रधान, पोहवा चंद्रकांत बरकुंड, राज वैद्य, राजु डोंगरे तसेच पोलीस मुख्यालय गोंदिया येथील डी-आय स्टाफ यांनी सहकार्य केले.
रिपोर्ट : जुबेर शेख