*दिनांक- 5 जानेवारी 2025* गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत मा. पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी, श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव श्री. प्रमोद मडामे, व ठाणेदार पो. नि. भुषण बुराडे पो. स्टे. सालेकसा, यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोउपनि पांढरे, सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार, व जिल्हा पोलीस, SRPF बल गट चे अमलदार यांच्या सहकार्याने आज दिनांक 04/01/2025 रोज शनिवारला ग्राम पंचायत पुराडा अंतर्गत मौजा- ईळुकचुवा येथे श्री. प्रभुलाल ग्यानीराम आचले रा. ईळुकचुवा यांचे घरी ग्रामभेट आयोजीत करण्यात आली होती…..सदर ग्राभेटीत मौजा ईळुकचुवा येथील जनतेशी संवाद साधुन तेथील समस्या जाणुन घेतल्या त्या येणेप्रमाणे.–🕹️ *ग्रामभेट दरम्यान ग्रामस्थांच्या खालील समस्या जाणून घेतल्या➖* 1) मौजा ईळुकचुवा ते पुराडा देवरी जाणेकरिता बस सेवा उपलब्ध नसुन देवरी अथवा पुराडा येथे मार्केट करण्याकरिता आटो ने अथवा सायकल ने प्रवास करावा लागतो करिता देवरी ते पुराडा बस सेवा सुरु असुन पुराडा ते ईळुकचुवा बस सेवा सुरु करण्यात यावी.2) मौजा ईळुकचुआ हे अतिदुर्गम नक्षल भागातील गाव असुन किमान 50 ते 60 घरांची लोकवस्ती आहे.गावातील मुले व मुली शैक्षणीक, शारिरीक व सामाजीक दृष्टीने प्रबळ व्हावे याकरिता गावात खेळण्याकरिता क्रिडा मैदान व वाचनालयाची शासकीय स्तरावर सोय करण्यात यावी.3) गावात पिण्याचे पाण्याकरिता सौर उर्जेवर चालनारी मोटार पंप असुन पाणी टंकी व्दारे पाणी पुरवठा होत असतो परंतु सदरची सुविधा अपुरी पडत असल्याने पाण्याची पुर्णपणे पुर्तता होत नाही…. अधिकची पाणी टंकी व मोटार पंप ची व्यवस्था करण्यात यावी. ई. समस्या पोलीस विभागाला कळविण्यात आल्याने सदरच्या समस्या पोलीस प्रशासनाकडुन वरीष्ठांना कळवुन निराकरण करणेसबंधी आश्वासन देवुन सदरची ग्रामभेट पुर्ण करण्यात आली….सदर ग्रामभेटीत आसाराम नंदलाल कुभरे ग्रा.प. सदरस्य पुराडा, व ईतर ग्रामस्थ सहभागी झाले होते.*🕹️शाळाभेट व पाठ्यपुस्तक वितरण➖* ग्राभेटनंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईळुकचुवा येथे शाळाभेट घेवुन शाळेतील मुलामुलींना तसेच आंगणवाडी येथील बालगोपालांना पाठ्यपुस्तक, ड्राईंग बुक, पाणीबॉटल, अल्पोहार ई. साहित्य सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपारच्या वतीने वितरण करण्यात आले. वितरण कार्यक्रमात शाळेतील मुख्याध्यापक श्री. यु. डी.नोळे, आंगणवाडी सेवीका श्रीमती कल्पणा श्रिकृष्ण टप्पे, व ग्रामस्थ हजर होते.मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश मार्गदर्शपनपर सुचना प्रमाणे सर्व प्रकारच्या SOP चे पालन करुन प्रभारी अधिकारी सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार, पोउपनि पांढरे, तसेच जिल्हा पोलीस चे अमलदार श्रे. पोउपनि कोरचे, पोना. बरईकर, पोशि. शहारे, वाढीवे व सशस्त्र पोलीस बल गट चे अमलदार मिळुन ग्राभेट व शाळाभेट पाठयपुस्तक वितरण कार्यक्रम शांततेत व यशस्वीरित्या पार पडला.

रिपोर्ट : जुबेर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *