*दिनांक- 27/12/2024* 🕹️📍****** *मा. श्री. प्रजित नायर, जिल्हाधिकारी, गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया, मा. श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया यांचेसमक्ष 7 लाखाचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याने केले आत्मसमर्पण➖* 🕹️**** *देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम, वय 27 वर्ष, रा. गुंडम सुटबाईपारा, पोस्ट- बासागुडा, तहसील- ऊसुर, पो. स्टे. पामेड, जिल्हा- बिजापुर (छ.ग.) (सदस्य तांडा दलम, मलाजखंड दलम, पामेड प्लाटून- 9/ प्लाटून पार्टी कमिटी मेंबर) असे आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्याचे नाव आहे..* ⏩ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करुन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पण योजना राबविली जात आहे. 🕹️**** गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा यांचे मार्गदर्शनाखाली माओवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता गोंदिया जिल्हयात प्रभावी नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत असुन विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला/नागरीकांना देवून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच जे माओवादी विविध भूलथापा व प्रलोभनांना बळी पडुन माओवादी संघटने भरती झाले आहेत त्यांना हिंसेचा मार्ग सोडुन समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. 🕹️*** गोंदिया जिल्हा पोलीसांच्या आत्मसमर्पण संबंधी केलेल्या आवाहनाला प्रभावित होवून आणि माओवादी संघटनेत होणारा त्रास व अत्याचारास कंटाळून 7 लाखाचे बक्षिस असलेल्या जहाल माओवादी नामे- देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम, वय 27 वर्ष, रा. गुंडम सुटबाईपारा, पोस्ट बासागुडा, तहसील ऊसुर, पोलीस स्टेशन- पामेड, जिल्हा बिजापुर (छ.ग.) प्लाटून पार्टी कमिटी मेंबर याने दिनांक- 26-12-2024 रोजी मा. श्री. प्रजित नायर, जिल्हाधिकारी, गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया यांचेसमक्ष आत्मसमर्पण केले आहे. 🕹️आत्मसमर्पित माओवादी देवा ऊर्फ अर्जुन ऊर्फ राकेश याचे मुळ गाव- बिजापुर जिल्हयातील अति नक्षल प्रभावित भागात असल्याने त्याचे गावात पुर्वी पासुनच सशस्त्र गणवेषधारी माओवाद्यांचे येणे जाणे होते…..माओवाद्यांच्या भुलथापा व प्रलोभनांना बळी पडुन त्यांच्या निर्देशाप्रमाणे लहानपणापासुनच तो नक्षल चळवळीत….. सहभागी होवुन बाल संघटनमध्ये काम करीत होता…… त्यानंतर सन- 2014 मध्ये तो पामेड दलम (दक्षीण बस्तर), जि. बिजापुर मध्ये भरती झाला व शस्त्र हातात घेतले… पामेड दलम मध्ये 6 महिने काम केल्यानंतर सन- 2014 चे अखेरीस त्याने अबुझमाड एरीया मध्ये अडीच महिन्याचे प्रशिक्षण घेतले, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यास सन 2015 मध्ये माओवाद्यांचे बस्तर एरीया मधुन एम. एस. सी. (महाराष्ट्र- मध्यप्रदेश -छत्तीसगड) झोन कडे पाठविण्यात आले. एम.एम.सी. मध्ये येवून सुरुवातीला त्याने दलम सदस्य म्हणून सन 2015 ते 2016 पर्यंत तांडा दलम व सन 2016 ते 2017 पर्यंत मलाजखंड दलम मध्ये काम केले…त्यादरम्यान मलाजखंड एरीया चा डि.व्ही.सी.एम. चंदु ऊर्फ देवचंद याचा अंगरक्षक म्हणून काम केले…. सन- 2018 मध्ये त्यास परत दक्षीण बस्तर एरीया मध्ये पाठविण्यात आले… सन 2018 ते सप्टेंबर 2019 पर्यंत (माओवादी संघटना सोडण्यापर्यंत) त्याने पामेड प्लाटून क्रं. 9 मध्ये प्लाटून दलम सदस्य म्हणून काम केले…🕹️ *आत्मसमर्पीत माओवादी देवा* हा सन 2014 ते 2019 नक्षल संघटनेत कार्यरत असतांना टिपागड फायरींग (जिल्हा गडचिरोली), झिलमिली काशीबहरा बकरकट्टा फायरींग (जि. राजनांदगाव, छ.ग.), झिलमिली / मलैदा फॉरेस्ट कर्मचारी यांना मारहाण व चौकी जाळपोळ (जि. राजनांदगाव, छ.ग.), हत्तीगुडा / घोडापाठ फायरींग (जि. राजनांदगाव, छ.ग.), किस्टाराम ब्लास्ट (जि. सुकमा, छ.ग.), पामेड फायरींग (जि. बिजापुर, छ.ग.) इ. गुन्हयात सहभागी असल्याची माहिती दिली आहे…परंतु नक्षल चळवळीच्या नावाखाली वरीष्ठ कैडर ची चाललेली मनमानी, फंड चे नावाखाली चाललेली पैश्याची लुटमार, खोटी ध्येय धोरणे, भुलथापा, प्रलोभने, हिंसा या सर्व बाबीचा खरा चेहरा-मोहरा समोर आल्यानंतर नमुद माओवाद्याने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला…🕹️ *आत्मसमर्पीत होण्याची महत्वाची कारणे ➖👇* 1) नक्षल चळवळीचे नेमके ध्येय धोरण खालच्या कॅडर यांना कळत नाही… भविष्य अंधकारमय वाटतो.2) माओवादी संघटनेतील वरिष्ठ कॅडर हे विविध स्त्रोत्रांकडुन पैसे फंड गोळा करण्याबाबत सांगतात. परंतु त्यातील एकही पैसा खालच्या कॅडर यांना मिळत नाही. सदर रक्कम वरीष्ठ कॅडर स्वतःसाठीच वापरतात.3) शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेचा माओवाद्यांना पाहिजे तसा पाठींबा मिळत नाही.4) माओवादी नेते हे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक- युवतींचा वापर करुन त्यांना नक्षल चळवळीत ओढतात.5) दलम मध्ये असतांना विवाह झाले तरी वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.6) परीवारातील सदस्यांना, नातेवाईकांना कोणतीही अडी-अडचण आली तरी देखील मदत करता येत नाही.7) दलम मध्ये असतांना वेळेवर जेवण वगैरे मिळत नाही…. तेथील जिवन अत्यंत खडतर असते.8) दलम मध्ये असतांना भटकंतीचे जिवन जगावे लागत असुन आरोग्या संबंधी समस्य उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिले जात नाही.9) पोलीस दलाच्या सतत च्या नक्षल विरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे.. पोलीसांची सारखी भिती वाटते.10) वरिष्ठ कॅडर हे पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन निरपराध गरीब आदिवासी बांधव/ सामान्य नागरीकांना ठार मारायला सांगतात.11) महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला प्रभावित होवुन आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. 🕹️ गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासना तर्फे राबविण्यात येणारे प्रभावी नक्षल विरोधी अभियान व त्याबरोबरच शासनाच्या आत्मसमर्पण योजने अंतर्गत सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासंबंधाने केलेल्या आवाहनाला अनुसरुन हिंसेचा मार्ग सोडुन समाजाच्या मुळ प्रवाहात समाविष्ठ होवुन सन्मानाने जिवन जगण्यासाठी सन-2005 पासुन (आत्मसमर्पण योजना अंमलात आल्यापासुन) ते आजर्पत एकुण 23 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे… 📍 सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवुन त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कार्यवाही मा. श्री. संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षल विरोधी अभियान नागपूर, मा. श्री. अंकीत गोयल, पोलीस उप- महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, मा. श्री. प्रजित नायर, जिल्हाधिकारी गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया व मा. श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.. 📍गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासना तर्फे मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अप्पर पोलीस अधीक्षक,गोंदिया कॅम्प देवरी यांनी “विकास कामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर गोंदिया पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास समर्थ असुन जे माओवादी हिंसेचा मार्ग त्यागून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ठ होण्यास ईच्छुक असतील त्यांना आत्मसमर्पण करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देवुन त्यांचे जिवन सुकर करण्यास व त्यांना सन्मानाने जिवन जगण्यास गोंदिया पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल” असे आवाहन केले.
रिपोर्ट : जुबेर शेख