२ लाख ६६ हजार ७५० रुपयांचा ठोठावला दंड..गोंदिया, दि.२१ डिसेंबर २०२४ जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २८१ वाहन चालकांवर कार्रवाई करण्यात आली तर १०३ वाहन जप्त करण्यात आली आहेत. या वाहन चालकांवर २ लाख ६६ हजार ७५० रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. सदर माहिती २१ डिसेंबर रोजी जिला वाहतुक शाखेत आयोजित पत्रपरिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी दिली.पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकी स्वारांवर विशेष मोहिमे अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढेही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर जिल्हा वाहतुक शाखेतर्फे संपुर्ण जिल्हयात वेळोवेळी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले आहे.

रिपोर्ट : जुबेर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *