गोंदिया(देवरी), दि.२९: राज्य पोलीस दलातील आयपीएससह राज्य पोलीस सेवेतील जवळपास ८५ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश गृह विभागाने काढले आहे. यामध्ये गोंदियाचे अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांची नागपूर शहर उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे. तर अकोल्याचे अप्पर अप्पर पोलीस अधिक्षक राहणार आहेत.पोलीस सेवेतील प्रशासकीय बदल्यांचे आदेश धडकले आहेत. यात संपूर्ण राज्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून पदस्थापनेपासून वंचित राहिलेल्या काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी उपविभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत असलेले नित्यानंद झा यांचे नागपूर शहर उपायुक्त पदी स्थानांतरण झाले आहे. त्यांच्या ठिकाणी अकोल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांची नियुक्ती झाली आहे. तर चंद्रपूर आयआरबी ४ च्या समादेशक भाग्यश्री नवटके यांची गोंदियात आयआरबी २ च्या समादेशकपदी बदली करण्यात आली आहे.

रिपोर्ट : जुबैर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *