
प्रेस नोट गुरुवार दिनांक- १३/०६/ 2025
Gondia दि. 9/6/2025 :रोजी एक इसम जैन कशाल भवनजवळ हात ठेल्यावर आठ ते दहा पांढ्यया पोत्यात प्लॉस्टीक पन्नीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेली पॉलीथीन घेवून जात आहे अशी गोपनिय माहिती गोंदिया शहर पोलीसांना मिळाली होती. त्याप्रमाणे गोंदिया शहर डी.बी. पथकातील अंमलदार यांनी पो.नि. किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात त्याठीकाणी जावून पाहणी केली असता एक इसम हा हातठेल्यावर 9 पांढ्यया पोत्यात शासनाने प्रतिबंधीत केलेली 70 किलो किं.अं. 36,000/- रु. ची प्लॉस्टीक पन्नी घेवून जातांना मिळुन आला. सदरची पॉलीथीन ही शासनाने प्रतिबंधीत केलेली असल्याने पुढील कार्यवाही कामी जप्त करण्यात आली. सदर मालाबाबत चौकशी केली असता शैलू राजेंद्र असाटी रा. सब्जी मंडी इसरका मार्केट गोंदिया यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मिळुन आलेली पॉलीथीन ही शासनाने प्रतिबंधीत केलेली असल्याने पुढील कार्यवाही कामी नगर परिषद गोंदिया येथे माहिती दिली असता तेथील स्वच्छता विभाग प्रमुख श्री नितीन बोरखडे यांनी येवून श्री शैलू राजेंद्र असाटी याच्याकडुन दि. 10/6/2025 रोजी 5000/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे. तरी, शासनाने प्रतिबंधीत केलेली पॉलीथीन कोणी विक्री करतांनी आढळुन आल्यास यापुढे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल . सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्रीमती रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री किशोर पर्वते, डी.बी. पथकाचे पो.हवा. कवलपालसिंग भाटीया, सतीश शेंडे , सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हाण, दिपक राहांगडाले, पौषी . सुभाष सोनवाने, दिनेश बिसेन, मुकेश रावते,अशोक राहांगडाले, प्रमोद शेंडे , सोनु नागपुरे, राकेश बंजारे यांनी केली आहे.
रिपोर्ट : जुबैर शेख
