
विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजला आहे. सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागलेले आहेत. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या आमगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीची टिकीट वाटप झाली आहे. अनेक नवख्या उमेदवारानीं उमेदवारीचे दावे ठोकले. परंतु त्या नवख्या उमेदवारानां डावलत महाविकास आघाडी व महायुतीने आपले उमेदवार घोषीत केले आहे. ज्यात अनेक अपक्ष उमेदवार आमगाव – देवरी विधानसभा 2024 च्या निवडणूकीत अपक्ष लढण्याची तयारी दाखवत आहेत. आदिवासी समाजाच्या समस्या मांडन्यास मि तत्पर असल्याची भुमीका घेत आदिवासी समाजातील नागरींकाची व मतदारांची झालेली दिसाभुल दुर करुन त्यानां प्रवाहात आणन्याचा प्रयत्न करनार असल्याची भुमीका आमगाव विधानसभेचे अपक्ष उमेदवार यशवंत मलये यानीं पत्रकार परिषदेत माहीती दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलतानीं मलये यानीं सांगीतले की, महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीसाठी एकूण २५ विधानसभा मतदार संघ राखिव आहेत, जेणेकरुन आदिवासी क्षेत्राच्या प्रतिनीधी कडून जनतेचे प्रश्न सोडविण्यास सोयीस्कर होईल, परंतु आदिवासी आमदाराच्या स्वार्थापोटी आणि राजकिय पक्षाच्या आडमुठे धोरणामुळे आदिवासी क्षेत्राचा विकास अजुन पर्यंत पाहिजे तसा झालेला नाही. कारण या क्षेत्रातील आमदारांनी विधानसभेत क्षेत्राच्या विकासासाठी बदलत्या परिस्थिती नुसार अपेक्षीत प्रश्न विधानसभेत उपस्थित केलेच नाहीत. सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून आमगाव विधानसभा क्षेत्रातील लोकांना पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न विधानसभेत निर्भीडपणे माडण्यासाठी मि यशवंत अंताराम मलये, राज्य अध्यक्ष ऑल इंडीया एम्प्लाईज फेडरेशन नागपूर, जिल्हा अध्यक्ष आदिवासी हलबा / हलबी समाज कर्मचारी महासंघ गोंदिया, सचिव- आदिवासी मानव संशोधन आणि सामाजिकप विकास संस्था आणि -कोषाध्यक्ष- संयुक्त अदिवासी उत्सव समिती मुंबई , यांनी दिनांक २५/१०/२०२४ रोजी आमगाव विधानसंभा क्षेत्रातून अपक्ष निवडणुक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलो असल्याचे त्यानीं पत्रकार परिषदेत सांगीतले आहे.जो पर्यत क्षेत्रातील विद्यार्थी, शेतकरी, महिला अणि सुशिक्षीत बेरोजगार वर्ग यांचा विकास होणार नाही तोपर्यंत ह्या क्षेत्राचा विकास होणार नाही, यावर ठामपणे विचार करुन आाणि विकासाची विचारधारा गावोगावी पोहचवीण्यासाठी क्षेत्रातील ३१० बुथातील गावांना यशवंत मलये यांनी प्रत्यक्ष भेटी देवून लोकांना प्रबोधन केले आहे. यशवंत मलये यांच्या विकास प्रबोधनाला मतदारांकडुन भरभरुन प्रतिसाद मिळालेला आहे, आणि त्याच आधारावर विधानसभा निवडणुक जिंकन्याचा निर्धार अपक्ष उमेदवार यशवंत मलये यांच्या तर्फे करण्यात येत असून 2024 ची विधानसभा निवडणूक लढणार व ते मी जिकंनार असल्याच्या शब्दावर ठाम असल्याची माहिती त्यानीं पत्रकार परिषदेत दिली आहे.
रिपोर्ट : जुबेर शेख
