
*दिनांक 30 मार्च 2025*
*फसवणूक करून लबाडीने गळ्यातील चैन घेवून जाणाऱ्यास जेरबंद करून ठोकल्या बेड्या* *लॉकेटसह सोन्याची चैन, व गुन्ह्यात वापरलेली मो. सायकल असा किंमती 1 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त -* *आरोपी नामे- लोकेशकुमार श्रीराम माहूरकर* वय 36 राहणार-सातोना तालुका तिरोडा, जिल्हा गोंदिया असे गुन्ह्यात जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे..📍… याबाबत थोडक्यात हकिगत अशी की, घटना दिनांक- 26/03/2025 रोजी एका अनोळखी इसमाने तक्रारदार नामे – रेखचंद शिवलाल पटले रा. मुंडिपार, तिरोडा हे बँकेत असतांनी त्यांच्या मो. क्रमांक वर 15.00 वाजता दरम्यान फोन केला व फिर्यादीस तुमचा चेक माझ्याकडे आहे. तुम्ही बिरर्सी फाटयावर या असे म्हटले फिर्यादीने त्यास तुम्ही तिरोडयाला या असे म्हटले व अनोळखी इसमांने मी तिरोडा येथे येतो असे म्हणाले नंतर 20 ते 25 मिनटांनी अनोळखी इसमाने फिर्यादी च्या मोबाईल वर पुन्हा दुसऱ्यादा फोन करून आम्ही सुकडी फाटयावर जेवण करत आहे. तुम्ही त्या ठिकाणी या असे म्हटल्याने फिर्यादी हे आपले मो. सायकल ने सुकडी फाटयावर गेले तेव्हा त्या ठिकाणी अनोळखी इसम उभा होता. त्यांनी पटले जी थांबा म्हणुन फिर्यादी थांबले त्याअनोळखी इसमाने फिर्यादीचा मोबाईल मागितला व एक फोन साहेबाला करायचा आहे. तर तुमचा मोबाईल द्या म्हणुन फिर्यादीने आपला मोबाईल दिला. तर त्यानी मोबाईलवर फोन केलेला नंबर डिलेट केले व मोबाईल परत केला व म्हणाला की साहेब लोक मलपुरी फाटा येथे आहेत. माझा सोबत चला तर तो आपल्या मोटार सायकलने आणि तक्रारदार त्याच्या सोबत आपल्या मोटार सायकलने मलपुरी फाटयावर गेले तिथे थांबल्यानंतर अनोळखी इसमाने फिर्यादीचे गळया मध्ये मकडी (किडा) आहे म्हणुन बहाना करून गळयातील चैन घेवून पसार झाला… अनोळखी इसमाने फिर्यादीस भुलथाफा देवुन फसवणुक करून गळयातील 10 ग्रॅम सोन्याची चैन किमंती 32,000/- रू व चैन मध्ये एक सोन्याचे हनुमानचे लॉकेट कि.8000/- रू. असा किंमती एकुण 40,000/- रू. चा मुद्देमाल अनोळखी ईसमाने भुलथाफा देवुन घेवुन गेल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून पो. ठाणे तिरोडा येथे *अपराध क्र 279/2025 कलम 318 (4) भा.न्या.सं. 2023 अन्वये* दाखल करण्यात आले आहे.. मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पथकास तक्रारदार यांचेकडून अनोळखी आरोपीची मिळालेली माहिती, मोबाइल क्रमांकाचे केलेले तांत्रिक विश्लेषण, बातमीदार यांचेकडून प्राप्त गोपनीय माहिती या आधारे – *आरोपी नामे* *लोकेश कुमार श्रीराम माहूरकर वय 36 राहणार- सातोना तालुका तिरोडा, जिल्हा गोंदिया* यास गुन्ह्याचे अनुषंगाने दिनांक 29/03/2025 रोजी ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले…त्यास गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपूस, चौकशी, तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे..आरोपी यांचे ताब्यातून गुन्ह्यात लबाडीने फसवणूक करून गळयातील घेवून गेलेली लॉकेटसह सोन्याची चैन, व गुन्ह्यात वापरलेली मो. सायकल असा किंमती 1 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे….आरोपीस गुन्ह्याचे पुढील तपास संबंधाने तिरोडा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे.. पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया तिरोडा पोलीस करीत आहेत..सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यांनंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे. श्री. धीरज राजूरकर, पोलीस पथक इंद्रजीत बिसेन , प्रकाश गायधने, राजू मिश्रा , महेश मेहर, दुर्गेश तिवारी, सुबोध बीसेन, सोमेंद्र तूरकर, राम खंदारे, घनश्याम कुंभलवार यांनी बजावली आहे..
रिपोर्ट : जुबैर शेख
