पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे रावणवाडी चे पोलीस निरीक्षक श्री. वैभव पवार यांचे मार्गदर्शनात रावनवाडी पोलीस ठाणे हद्दीतील रिक्षा चालक यांना आज दिनांक- 23 जानेवारी 2025 रोजी पोलीस स्टेशनला बोलावून नवीन कायद्यांची ओळख तसेच वाहतुकीचे चे कारवाई दंड वाढलेल्या रक्कम याची माहिती देवून मार्गदर्शन करण्यात आले.
त्याचप्रमाणे पो.ठाणे रावणवाडी हद्दीतील रिक्षाचालक व रावणवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडी यांच्या मदतीने पोलीस ठाणे रावणवाडी येथे शारीरिक आरोग्य तपासणी, व रक्त तपासणी चाचण्याचे शिबिर घेण्यात आले...
सदरचे आयोजित शिबिर तसेच मार्गदर्शन कार्यक्रमास पोलीस ठाणे रावणवाडी हद्दीतील 32 रिक्षाचालक तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला..



गोंदिया,महाराष्ट्र
जुबेर शेख
