दिनांक 07 जानेवारी 2025वाहांसह वाहन चालक देवरी पोलिसांचा ताब्यात चिचगड रोडच्या सालई गावाजवळील घटना …देवरी : देवरी शहरातून गेलेल्या चिचगड रोडवर सालई गावाजळ अद्नात वाहनाच्या धडकेत भिषण दुचाकी अपघात झाला. ज्यात दुचाकी चालकाचा मुंडक वेगळ तर धड वेगळ झाल्याची घटना काल दि.6 जानेवारी 2025 रोज सोमवार सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान घडली होती. ज्यात वाहन (ट्रक्टर) चालक वाहनासह घटना स्थळावरुन पसार झाला होता. ज्यामुळे नागरीकांना घात की अपघात ..? हा प्रश्न कायम पडला होता. ज्यावर आज दि.07 जानेवारी 2025 रोज मगंळवारला देवरी पोलिसांनी वाहन व वाहन चालकाचा शोध घेत त्यांना ताब्यात घेन्यात आला आहे.सविस्तर असे की, निकेश आत्माराम कराडे वय 32 वर्षे रा. मोहगाव (आलेवाडा) ता.देवरी जि. गोंदिया हा दि. 6 जानेवारीला सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान MIDC येथिल काम संपल्यावर आपल्या दुचाकीने ( दुचाकी क्र. MH 35 AV 2968) गावाकडे परत जात असतानां, टिनाचे सेट व ईतर साहित्य घेऊन जानार्या बिना नंबर प्लेटच्या ट्रक्टर ला देवरी पोलिस्टेसन हद्दीतील चिचगड रोडवरील सालई गावाजवळ निकेशच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. हि धडक ईतकी भयानह होती की निकेशच मुंडक धडापासुन वेगळ होत त्याच जागीच मृत्यू झाला होता. सदर घटना घडताच घटना स्थळावरुन ट्रक्टर चालक हा ट्रक्टर घेऊन पसार झाला होता. देवरी पोलिसस्टेसनचे पोलिस कर्मचारी राम कांदे, अनिल ऊईके , पंकज राहागंडाले , कापसे, करंजेकर , रोशन डोये यानीं या घटनेचा जम्मुन तपास करीत त्या ट्रक्टर चालकाला ट्रक्टर सह ताब्यात घेतले आहे. या वर देवरी पोलिस्टेसनचे ठाणेदार प्रविण डांगे यानीं सांगीतले आहे की, सदर घटना घात नसुन अपघात आहे. ज्यातील ट्रक्टर चालक व ट्रक्टर देवरी पोलिसांच्या ताब्यात आहे.सदर घटनेतील वाहन (ट्रक्टर) चालकाचा बयान देवरी पोलिस घेत असुन ट्रक्टर ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा तपास वरिष्ट अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गीता मुळे करीत आहेत.
रिपोर्ट : जुबेर शेख