*दिनांक- 7 जानेवारी 2025* विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा…व त्यांचे ज्ञान आणि शिक्षण सुधारावे, गंभीर विचारांनी समस्या सोडवण्याचे कौशल्य त्यांचे अंगी यावे, त्यांच्यात आत्मविश्वास आणि टीम वर्क वाढावा, स्पर्धात्मक परीक्षा आणि मूल्यांकनणाची तयारी करण्याकरिता मदत व्हावी ……या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने….. अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. नित्यानंद झा, यांचे वतीने *”क्विझ कॉम्पिटिशन”* आयोजित करण्यात आलेली होती. सदर आयोजित क्वीज कॉम्पिटिशन चा स्क्रीनिंग राऊंड दिनांक- 30 डिसेंबर 2024 रोजी गोंदिया पब्लीक हायस्कूल येथे पार पडला….सदर स्क्रीनिंग राऊंडमध्ये जिल्ह्यातील 27 शाळांच्या 53 टीम सहभागी झाल्या होत्या प्रत्येक टीम मध्ये 3 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे संपूर्ण पर्यवेक्षण अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी केले..दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी प्रेरणा सभागृह, पोलीस मुख्यालय गोंदिया येथे स्क्रीनिंग राऊंड च्या अंतिम स्पर्धा घेण्यात आल्या… 6 जानेवारी 2025 रोजी झालेल्या अंतिम फेरीसाठी 53 संघापैकी अव्वल पाच संघ निवडले गेले… पाच संघात अंतिम सामन्यांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली *ज्यामध्ये* — *1) मेरिटोरिअस पब्लिक स्कूल, तिरोडा संघाने* बाजी मारत *प्रथम क्रमांक पटकाविला* तर 2) *विवेक मंदिर, गोंदिया द्वितीय* *3) गोंदिया पब्लिक स्कूल, तृतीय* *4) प्रोग्रेसिव्ह स्कूल- चतुर्थ* 5) *विवेक मंदिर अंतीम फेरीत विजेते ठरले…* कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय जिल्हाधिकारी श्री. प्रजीत नायर साहेब, तसेच पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, साहेब यांचे शुभहस्ते *प्रथम पारितोषिक विजेत्याला* दहा हजार रुपये रोख रक्कम, एक मोमेटो व प्रमाणपत्र देण्यात आले…. *द्वितीय क्रमांक*- सात हजार रुपये रोख रक्कम,मोमेटो, प्रमाणपत्र देण्यात आले.. *तृतीय क्रमांक ला-* पाच हजार रुपये रोख रक्कम, मोमेंटो व प्रमाणपत्र देण्यात आले.. तर चौथा आणि पाचव्या क्रमांकाला उत्तेजनार्थ प्रत्येकी पंधराशे रुपये रोख रक्कम आणि मोमेंटो प्रमाणपत्र बक्षीस म्हणुन देण्यात आले..सदर प्रश्न मंजुषा स्पर्धेच्या सर्व प्रश्नपत्रिका व परीक्षण अप्पर पोलीस अधीक्षक श्री . नित्यानंद झा साहेब यांनी केले. प्रेरणा सभागृह, पोलीस मुख्यालय गोंदिया येथील आयोजित अंतिम फेरी स्पर्धेस गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय प्रजित नायर साहेब, पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री गोरख भामरे, साहेब प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत.. तसेच सहभागी शाळेतील साधारण 150 विद्यार्थी, शिक्षक वृंद, पोलीस अधिकारी, अंमलदार मोठ्या संख्येने स्पर्धेत उपस्थित होते…. क्विझ कॉम्पिटिशन मध्ये सहभागी टीम मध्ये शेवटच्या सामन्यांमध्ये अत्यंत चुरशीची व उल्लेखनीय अशी लढत पाहायला मिळाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सदर स्पर्धा पार पडली… संपुर्ण प्रश्न मंजुषा स्पर्धा अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, साहेब यांचे पर्यवेक्षणाखाली आयोजित करण्यात आली……गोंदिया पब्लिक स्कूलच्या प्राचार्य श्रीमती रिंकू बैरागी मॅडम आणि शिक्षक वृंद यांचे विशेष असे मोलाचे सहकार्य लाभले..

रिपोर्ट : जुबेर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *