*दिनांक-01 जानेवारी 2025* *– रावणवाडी हद्दीतील नागरिकांचे हरविलेल्या मोबाईलचा तांत्रीक पध्दतीने शोध घेवून नवंवर्षाच्या शुभ मुहुर्तावर 12 महागडे मोबाईल किमती 1,25,000/- रूपयांचे मुळ मालकांना केले परत..* 🕹️ याबाबत थोडक्यांत माहिती अशी की, रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे वेगवेगळया ठिकाणाहुन वेगवेगळे कंपनीचे महागडे मोबाईल हँडसेट हरविल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यास प्राप्त झालेल्या होत्या…. सदर तक्रारीचे अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे रावणवाडी पोलीस ठाणे चे ठाणेदार श्री. वैभव पवार, पोलीस निरीक्षक यांनी गंभीर दखल घेवून त्यांच्या अधिनस्त पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करुन हरविलेल्या मोबाईलचे शास्त्रोक्त पध्दतीने शोध घेण्याबाबत आदेशीत केले होते.. या अनुषंगाने पोलीस ठाणे रावणवाडी येथील पोलीस पथक यांनी हरविलेल्या मोबाईलचे केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर (CEIR) या अप्लीकेशन वर हरविलेले मोबाईल चे अर्ज अपलोड करुन पथकाने रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतुन वेगवेगळ्या कंपनीचे हरविलेले एकुण 12 महागडे मोबाईल शास्त्रोक्त तांत्रीकशुद्ध पध्दत व बुध्दीकौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफीने शोधुन काढले. सदरचे मोबाईल नवंवर्षाच्या शुभ मुहुर्तावर आज दिनांक- 1 जानेवारी 2025 रोजी श्री. वैभव पवार, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे रावणवाडी यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आलेत……. मोबाईल मालकांना त्यांचे हरविलेले मोबाईल त्यांच्या हाती परत येताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्दिगुणीत होवून समाधान दिसत होते…. पोलीसांच्या या स्तुत्य कामगीरीचे सगळीकडेच कौतुक होत आहे. सदरची उल्लेखनीय कामगीरी पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री.नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रावणवाडी चे पो.नि.श्री. वैभव पवार, अंमलदार पो. ना. महेंद्र कटरे, पो.शि. रजनिकांत बोपचे, तसेच तांत्रीक सेल गोंदिया येथील पोलीस अधिकारी- अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे..
रिपोर्ट : जुबेर शेख