ग्राम पिंडकेपार/गोटा. येथील घटना..

देवरी, दि.२५ डिसेंबर २०२४

२० डिसेंबर २०२४ ला दुपारी अंदाजे १:०० वाजे दरम्यान, देवरी पोलीस ठाणे अंतर्गत ग्राम पिंडकेपार/गो.येथून अज्ञात इसमाने दुचाकी लंपास करण्याची घटना घडली आहे. देवरी पोलीस स्टेशन येथे अज्ञात दुचाकी चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर असे की, फिर्यादी यशवंत संतु दिहारी वय ४५ वर्ष रा. टेकाबेदर ता. देवरी यांचा मुलगा आपल्या भावासोबत आपल्या घरच्या मोटार सायकलने पिंडकेपार येथे मंडई व कबड्डी टूर्नामेंट पाहण्याकरिता गेला असता, आपली मोटर सायकल हिरो कंपनीची काळया रंगाची मोटर सायकल क्रमांक एम.एच. ३५ ए. एम.०२७६ बाजूला ठेवलेल्या इतर गाड्यांसोबत हँडल लॉक करून ठेवली होती. कार्यक्रम संपल्यानंतर फिर्यादीचा मुलगा ठेवलेल्या ठिकाणी आपली मोटरसायकल बघितली असता, मोटरसायकल दिसून आली नाही. सदर मोटर सायकलच्या आजूबाजूला शोध घेतला परंतु मिळून न आल्याने कोणीतरी अज्ञात इसमाने मोटरसायकल चोरून नेले आहे असे फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन देवरी येथे अप क्र.४३६/२०२४ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता २०२३ अननवे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हाचा तपास पोहवा. मस्के करीत आहेत.

रिपोर्ट : जुबैर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *