
⏩ याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 14-10-2024 रोजीचे 17.00 वाजता ते दिनांक 15-10-2024 चे 09.30 वाजता दरम्यान सुदामा हायस्कूल आसोली येथे अज्ञात चोरट्यांनी सुनामौका पाहुन शाळेतील कॅम्प्युटर रूममध्ये ठेवलेले कम्प्युटर संच मॉनिटर, सी.पी.यु.,किबोर्ड, माऊस, केबल वायर, व पोषण आहाराचे साहित्य 5 क्वींटल तांदुळ,तुळीची व मसुर दाळ, खाद्य तेलाचे पॅकेट असा एकुण किमती 49,000 रू.चा मुद्देमाल शाळेच्या रूमचे ताला तोडुन चोरून नेल्याचे फिर्यादि नामे- श्री. टेकचांद नागपुरे यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण येथे *अपराध क्रमांक- 604/2024 कलम 305(अ), 331 (4) भा न्याय.संह.-2023* अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते.. स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया चे पोलीस पथक….. नमूद दाखल गुन्ह्याचा समांतर तपास व शाळेत चोरी करणाऱ्या अज्ञात गुन्हेगारांचा शोध करीत असताना…पोलीस पथकास दिनांक- 18-12-2024 रोजी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की….. *इसम नामे- आशिष मेश्राम* राहणार आसोली यांनी काही दिवसापूर्वी सुदामा शाळेत चोरी केली असून त्याच्याकडे चोरीचे साहित्य ठेवले असून विक्री करणार आहे. अशा खात्रीलायक मिळालेल्या माहितीच्या आधारे- स्था . गु.शा. पोलीस पथकाने दिनांक 19-12-2024 रोजी शाळेत चोरी करणारे *चोरटे गुन्हेगार ईसम नामे-* *1) आशिष उर्फ दशरथ हरिचंद मेश्राम वय 20 वर्ष, राहणार- आसोली तालुका- जिल्हा- गोंदिया* *2) आरिफ संतोष मटाले वय 20 वर्षे राहणार – आसोली तालुका-जिल्हा- गोंदिया* अश्या दोघांना संशयावरून ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले—दोघांनाही नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपूस चौकशी केली असता दोघांनीही सुदामा शाळेत चोरी केल्याचे सांगून गुन्हा कबूल केले….नमूद दोन्ही आरोपीतांचे ताब्यातून चोरी केलेले कम्प्युटर संच, सीपीयू मॉनिटर, ईतर साहित्य, व एक क्विंटल तांदूळ तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल असा *किमती एकूण 1 लाख 29 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत* करण्यात आले असुन गुन्ह्यांत जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपीतांना मुद्देमालासह पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले असून गोंदिया ग्रामीण पोलीस पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया करीत आहेत..
▪️सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया मा.श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक पो. हवा.भुवनलाल देशमुख, राजु मिश्रा, महेश मेहर, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, सुबोध बिसेन, इंद्रजीत बिसेन, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, छगन विठ्ठले, भांडारकर,चालक -राम खंदारे, घनश्याम कुंभलवार यांनी केलेली आहे.
रिपोर्टर: जुबैर शेख
