दिनांक :- २३/०७/२०२५ * गोंदिया :महाराष्ट्र शासनामार्फत Student Police Cadet Programme च्या कार्यक्रमाची अमलबजावणीकरिता ८ वी व ९ वी वर्गातील विद्यार्थ्यामध्ये चांगली नितीमुल्ये रुजवुन जबाबदारी नागरिक बनविणे आहे, त्याचे कारण त्या वर्गाचे वयोगटातील विद्यार्थ्यांचे बुध्दीमत्ता लवचिक असते व आकलन शक्ति विपुल असते. त्या आधारावर प्रशिक्षणात गुन्हयास प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतुक जागरुकता, सायबर क्राईम, भ्रष्टाचार निर्मुलन, लिंग संवेदनशिलता, मुल्ये व नितीशास्त्र, सहनशिलता, पोलीस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, जनताभिमुख पोलीसिंग, महिला व बालकांची सुरक्षितता, बालविवाह, आईवडील गुरु यांचा सन्मान, समाजाचा विकास, दृष्ट सामाजिक प्रवृत्तीस आळा घालणे, नितीमुल्ये, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता इत्यादी विषयावर सरकारी शाळेतील ८ वी व ९ वी वर्गातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे मानस आहेत्याअनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २२/०७/२०२५ रोजी जिल्हा परिषद हॉयस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, तिरोडा येथे जावुन तेथील ०८ वी व ०९ वी वर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस हवालदार लिओनार्ड मार्टिन यांनी SPC कार्यक्रम घेण्यामागचे उद्देश सांगितले. तद्नंतर महिला पोलीस पोलीस उप-निरीक्षक सपना सिडाम, पोलीस उप-निरीक्षक तेजस कोंडे, सफौ. राजेश शेंद्रे, पोहवा. जफर सय्यद व मपोहवा. तनुजा मेश्राम यांनी मार्गदर्शन करुन महाराष्ट्र पोलीसांची ओळख कामकाज व त्यांच्या इतिहास, गुन्हयास प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतुक जागरुकता, सायबर क्राईम, बालविवाह, भ्रष्टाचार निर्मुलन, आई-वडील गुरु यांचा सन्मान, महिला व बालकांची सुरक्षितता, स्वच्छता व पो.स्टे. चे कामकाज याबाबत अत्यंत मोलाचे मार्गदशन केले.सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद हॉयस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोडा येथील प्राचार्य श्री. डी.एन. धुर्वे सर, कु. आर.आर. मेश्राम मॅडम, कु. बी.पी. कापगते मॅडम, श्री. एन. आर सुसाटकर सर आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन जिल्हा परिषद हॉयस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोडा येथील श्री. हेमंत राहंगडाले सर यांनी केले. सदर प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्याकरिता पोलीस उप-निरीक्षक तेजस कोंडे, पोहवा लिओनार्ड मार्टिन व राज वैद्य, यांनी सहकार्य केले.

रिपोर्ट : जुबैर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *